KYC Update Link द्वारे फसवणूक रक्कम रु. १,१६,८९९/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास मोठे यश !!

प्रतिनिधी- अक्षय कांबळे
काशिमिरा:
मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोस्टे हद्दीतील इसम नामे श्री. जैसवाल यांना त्यांचे मोबाईलवर एचडीएफसी बँक अकाऊंटचे के. वाय. सी. अपडेट संदर्भात लिंक प्राप्त झाली. त्यांनी ती लिंक क्लिक केल्यानंतर त्यांचे अकाऊंट व क्रेडीट कार्डवरून अनुक्रमे ४९,९९९/-, ५९,९९९/-, ५६,९०० /- रुपये असे एकूण १६६८९८ /- रुपये काढून घेतलेबाबत सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रार प्राप्त होती.
(सायबर गुन्हे कक्ष आवक अर्ज क्रमांक - १८०५-बी/२०२३ दि.०८/०८/२०२३)
नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे फसवणूक रक्कमेचा वापर करुन Billdesk, Yes Bank, Chroma द्वारे शॉपींग केली गेल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ पत्रव्यवहार व पाठपूरावा करुन फसवणूक रक्कम थांबविण्यात आली व पुन्हा तक्रारदार यांचे १,१६,८९९/- रुपये मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी...

- Kyc Update Link संदर्भात लिंक वर क्लिक करू नये.
- आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती देवू नये.
- अशा फसव्या कॉल, एसएमएस प्रतिसाद देवू नका.
- असे कॉल, एसएमएस प्राप्त झाल्यास तात्काळ बँकेसोबत संपर्क साधावा.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी. सदरची कामगिरी श्री.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, स.पो.नि. स्वप्नील वाव्हळ, पो.उप.निरी. प्रसाद शेनोळकर, म. पो. हवा. माधुरी धिंडे, पो. अं. गणेश इलग, प्रविण आव्हाड, म.पो.अं. पल्लवी निकम, अमिना पठाण, सुवर्णा माळी, पो. अं. कुणाल सावळे, प्रशांत बोरकर यांनी पार पाडली आहे.</code></pre></li>
सायबर गुन्हे शाखा संपर्क क्रमांक :- ०२२-२८११ ०१३५
सायबर गुन्हे शाखा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक :- ९०० ४८८ ०१३५
सायबर गुन्हे शाखा ई-मेल आयडी :- cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com