सायबर पोलीसांनी मॅट्रिमोनियल साईटवरुन महिलेला ३ कोटी ६० लाख रुपये रक्कमेला फसवणारा इंटरनॅशनल महाठगास केले जेरबंद

0
Spread the love

पुणे

सह संपादक -रणजित मस्के

दिल्ली मधील एक महिला ही पुणे खराडी भागामध्ये वास्तव्याला असताना तिने shaadi.com प्रोफाईलवर लग्नाकरीता प्रोफाईल तयार केलेला होता. तिच्या प्रोफाईलवर shaadi.com वरील प्रोफाईल नं. SH८७३४१२३१ यावरुन ऑस्ट्रेलियन नागरीक (मुळ भारतीय) डॉक्टर रोहित ओबेरॉय नामक व्यक्तीने तिला सन २०२३ मध्ये मेसेज करुन ओळख वाढवुन, मैत्री करुन, त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवुन, तिचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर पिडीत महिला आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय हे वेळोवेळी पुणे व भारतातील इतर ठिकाणी वास्ताव्याला एकत्रीत राहिले. पिडीत महिलेस तिच्या पहिल्या पतीकडुन फारकती द्वारे ५ कोटी रुपये पोटगी मिळालेली होती त्यामुळे पुढील भविष्यात पिडीत महिला ही शाळेमध्ये लहान मुलांकरीता Mindfullness and spirituality प्रोग्रॅम घेऊन त्याद्वारे व्यवसाय करणेकरीता प्रयत्नशील असताना तिच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय यास माहित झाल्याने संधीचा फायदा घेऊन याने पिडीताला तो तिचा व्यवसाय आंतराराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊन व त्याकरीता फंडींग मिळून देतो असा बनाव करुन इव्हॉन हँन्दयानी, विन्सेंट कुआण या व्यक्ती सिंगापुरच्या असल्याचे सांगुन संगणमताने पिडीतास सीटी बैंक सिंगापुर व भारतातील काही बँका यामध्ये वेळोवेळी ३,६०,१८,५४०/-रुपये रक्कम भरण्यास भाग पाडले. कालांतराने डॉ. रोहित ओबेरॉय हा ऑस्ट्रेलियाला गेला व त्याने पिडीतास बोलण्यास टाळाटाळ करुन त्याला तोंडाचा कॅन्सर झाल्याचे भासवुन तब्येत सतत खालावत असल्याचे सांगुन पिडीता सोबत कायमचा संपर्क बंद केला व सप्टेंबर २०२४ मध्ये त्याचा पार्टनर विन्सेंट कुआण यांने पिडीतास एक ईमेल करुन त्यात डॉ. रोहित ओबेरॉय हा मरण पावला आहे असा मेसेज केला. तेव्हा पिडीताने सदरबाबत तिच्या मैत्रीणीला कळवली असता तिने हा फ्रॉड असु शकतो असे सांगितल्याने पिडीताने सर्व गोष्टी पडताळल्यावर पिडीतास खात्री झाली की, तिची डॉ. रोहित ओबेरॉय, इव्हॉन हँन्दयानी, विंन्सेंट कुआण यांनी आर्थिक फसवणुक केली आहे.

सदरबााबत पिडीताने नोव्हेंबर २०२४ रोजी तात्काळ एन.सी.आर.पी. पोर्टल १९३० यावर तसेच सायबर पोलीस ठाणे पुणे येथे संपर्क केला असता सायबर पोलीस ठाणे पुणे येथे डॉ. रोहित ओबेरॉय, इव्हॉन हँन्दयानी, विन्सेंट कुआण यांचे विरुध्द गुन्हा रजि. नं.८०९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१९(१), ३१९(२), ३१८(१),३१८(२), ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल करुन तपासी अधिकारी वरिष्ठ पालीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे
यांनी तपास केला असता गुन्ह्यातील मिळुन आलेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणद्वारे पिडीताला फसवणा-या व्यक्तीचे डॉ. रोहित ओबेरॉय नसुन त्याचे खरे नाव अभिषेक शरदचंद्र शुक्ला वय ४२ वर्षे राहणार मुळ लखनऊ, सध्या रा. पर्थ, ऑस्ट्रेलिया असे निष्पन्न झाले तसेच आरोपी हा बाहेरील देशात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे नावाचे लुक ऑउट सर्क्युलर (LOC) तात्काळ जारी केले असता दि.२५/०६/२०२५ रोजी सदर आरोपी सिंगापुर वरुन मुंबईला आल्याची खबर मिळताच सायबर पोलीस तपास पथक पोउपनि सुशिल डमरे व स्टाफ यांनी मुंबई एअरपोर्टवर त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक केलेली असुन सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला याने shaadi.com वर फेक प्रोफाईल तयार करुन एकुण ३,१९४ महिलांना मेसेज करुन संपर्क केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आरोपीने आणखी किती महिलांना लग्नाचे आमिष दाखवुन आर्थिक गंडा घातला आहे याची माहिती घेण्याचे कामकाज सायबर पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर, श्री. विवेक मासाळ मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे श्री. मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर, श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस उप-निरीक्षक सुशिल डमरे, पोलीस अंमलदार बाळासाो चव्हाण, संदिप मुंढे, नवनाथ कोंडे, सतीश मांढरे, संदिप यादव, संदिप पवार, अमोल कदम, सचिन शिंदे सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी सदरची कामगिरी केली आहे.

पुणे पोलीस दलाकडुन आव्हान –

१) मॅट्रिमोनियल साईट shaadi.com प्रोफाईल नं. SH८७३४१२३१ वावरुन डॉ. रोहित ओबेरॉय नामक व्यक्तीकडुन महिलांची आर्थिक फसवणुक झाली असेल तर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर मो.नं. ७०५८७१९३७१/७५ वावर तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांना संपर्क साधावा.

२) महिलांनी मॅट्रिमोनियल साईटवर लग्नाकरीता त्यांचे प्रोफाईल तयार केले असेल तर समोरील व्यक्तीने त्यांना त्याचे प्रोफाईल द्वारे संपर्क केला असता समोरील व्यक्ती बाबत शहानिशा करावी तसेच आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी.

३) मॅट्रिमोनियल साईटद्वारे महिलेला संपर्क साधलेला व्यक्ती हा बाहेर देशातील असल्याचे त्याने सांगितलेले असल्यास व तो भारतात आल्यावर त्याला कस्टम विभागाने पकडलेले आहे असे खोटे सांगुन त्याला सोडवण्यासाठी महिलांकडुन आर्थिक रक्कमेची मागणी करून फसवणुक करत असतो. अशा खोट्या बतावणीला महिलांनी फसु नये / बळी पडु नये.

४) सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ एन.सी.आर.पी. पोर्टल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट