बीड मधील सायबर पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी केली गजाआड…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

बीड :-

ऑनलाईन सिमेंट बॅग ऑर्डर केल्या पण सिमेंट ऐवजी लागला लाखो रुपयांना चुना, बेट जम्मू-कश्मीर मधुन आरोपींची फसवणूक.

दि. 13/04/2013 रोजी सिताराम तात्याराम माने वय 34 वर्ष व्यवसाय होलसेल दुकान रा. सदरबाजार, अंबाजोगाई यांना दुकानामध्ये असताना, केंद्रवाडी येथील शाळेच्या बांधकामासाठी सिमेंट लागणार होते यासाठी INDIAMART.COM पावर 520 अल्ट्राटेट सिमेट बॅगची मागणी केली. त्यानंतर थोड्यावेळाने फिर्यादीस फोन आला, आणि त्याने सांगितले की, मी अल्ट्राटेट कंपनीचा मैनेजर बोलत आहे असे सांगून 500Bags प्रतीनग किमत 230 रुपये प्रमाणे GST 289% प्रमाणे एकुण बील 1,15,000/- रुपयाची पावती व्हॉटसपव्दारे प्राप्त गाली त्यामुळे आरोपींनी दिलेले कोटक महीद्रा बैंक खाते व ifsc code सांगीतला व यावर फिर्यादीने दुकानाच्या नावे असलेला ICICI BANK अंकाऊट खाते क्रमाक च्या चेकवरुन 1,15,000/- रुपये भरणा केला परंतु फिर्यादीस सिमेंट प्राप्त झाले नाही यावरुन फिर्यादी ची ऑनलाईन फसवणुक झाली म्हणून गुन्हा करण्यात आला.

सायबर पोलीसांनी अथक परिश्रम करून सदर रक्कमेचा व आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. गुन्हयातित फसवणूक झालेली 115000/- रुपये हे यातिल आरोपी क्रमांक 01 नाम पंकज चमनलाल मेहरा वय 29 वर्ष रा. वार्ड नं 14 हतकली मोहं जि. कठुआ राज्य जम्मू कश्मीर 184102 याच्या खात्यावर ट्रान्सफर झालेली असल्याचे निदर्शनास आले.

दिनांक 11/10/2022 रोजी अनुक्रमे 50000/- 80000/- रुपये प्रमाणे हे हयातिल आरोपी क्रमांक 02 नाम करनकुमार सुभाषकुमार वय 28 वर्ष रा. वार्ड नं 22 चेकखुनी हल्कली मोर्ट जि. कठुआ राज्य जम्मू कश्मीर 184101 याचे खाते मध्ये ट्रान्सफर झालेली असल्याचे निदर्शनास आले.

मा. पोलीस अधीक्षक सो यांनी जम्मू-कश्मीर राज्यात तपासकामी जाण्याची परवानगी दिल्याने सायबर पथक जम्मू-कश्मीर कड़े रवाणा झाले.

सदर ठीकाणी अथक परिश्रमांना यश आले. सदर आरोपीचा औद्योगीक इस्तारे पोलीस चौकी, कटुआ, जम्मू कश्मीर येथील
स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने शोध घेतला असता, वरील आरोपी क्रमांक 1 व 2 तसेच त्यांचा साथीदार आरोपी क्रमांक 03) रामरंजनकुमार छोटेलाल वय 30 वर्ष रा. कुरकिहर पोस्ट बाजरगंगा नि. गया राज्य बिहार ह.मु. सीटोएम लेहोर कॉलनी रुम नं.डो-2-24. जि.कटुआ राज्य जम्मू कश्मीर येथे मिळून आले.

दिनांक 15/09/2023 रोजी वरील तिन्ही आरोपी हे सायबर पोलीस स्टेशन, बीड येथे हजर आले
असता, त्यांच्याकडे चौकशी केली असता, वरील आरोपी हे सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवून सदर
आरोपीतांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे नमूद गुन्हयात वापरलेले तिन मोबाईल मिळून आले. सदर आरोपीस मा. न्यायालय
अंबाजोगाई येथे रिमांड कामी हरण करण्यात आले असता मा. न्यायालयाने दि. 21/09/2023 पावेतो पालीसे कोठाडी रिमांड दिले आहे. सदर रिमांड मध्ये ईतर आरोपींचा शोध घेण्यात येणार आहे.

सदर कामगीरी मा. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक बीड सो, मा. सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक से, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. आर. साबळे, पोउपनि शैलेश जोगदंड, पो.ह. भारत जायभाये, पो.ह. बप्पासाहेब दराडे, पो.ह. अन्वर शेख, पो. अं. प्रदिपकुमार यायभट, सर्व सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे.

सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, ऑनलाईन खरेदी करतांना त्याची सत्यता पडताळून पहा, कोणत्याही आर्थिक अमिषाला बळी पडु नये असे आवाहन मा पोलीस अधीक्षक बीड यांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट