सायबर फ्रॉड झालेली १ कोटी ५३ लाख रुपये रक्कम वाई एमआडीसी मधील मालाज कंपनीला परत करण्यास वाई पोलीसांना यश..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

वाई :-दिनांक १०/०२/२०२५ रोजी वाई पोलीस ठाणे गुरनं ३५/२०२५ भारतीय न्याय सहिंता २०२३ चे कलम ३३७,३१६,३२९,३३१, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६,६६ (सी) प्रमाणे गुन्हा नोंद असुन मालाज कंपनीचे फुट प्रोसेसिंग प्लान्ट बी ४७एमआयडीसी, वाई, ता. वाई, जि. सातारा येथे दिनांक ०६/०१/२०२५ रोजी ते दिनांक २९/०१/२०२५ रोजी दरम्यान अज्ञात इसमाने कंपनीचे ई-मेल आयडी वरती फसवा ई-मेल पाठवुन आरोपीने त्याच्या खात्यावर १,७०,०००/- युरो (आज रोजीचे बाजार भाव किंमत भारतीय चलना नुसार १,५३,५२,७००/- रुपये) ट्रान्सफर करुन घेतले म्हणुन वाई पोलीस ठाणेस अज्ञात इसमा विरुध्द संगणकीय प्रणालीचा गैरवापर करुन व फसवणुक केले बाबत गुन्हा नोंद होता.

सदर गुन्ह्यात आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगार अंतर्भुत असल्याने तसेच अपहार झालेली रक्कम रुपये १ कोटी ५३ लाख इतकी मोठी असल्याने मा. पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख यांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरवून वाई पोलीस ठाणेचे तसेच सायबर पोलीस ठाणे सातारा यांचे अधिकारी अंमलदार यांस झाले गुन्ह्याबाबत वेगवेगळे तपासपथके तयार करुन आरोपीचा शोध घेणेकरिता व फसवणुक झालेली रक्कम परत मिळवणेकरिता सुचना दिल्या त्या प्रमाणे सायबर पोलीस ठाणे व बाई पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर लंडनस्थित विदेशी बँकेला बीएनएसएस ९४ प्रमाणे नोटीस देवुन त्वरीत सायबर फ्रॉड झालेली रक्कम होल्ड करणेस सांगीतले. तसेच सदरची १ कोटी ५३ लाख रक्कम कंपनीला मिळवुन दिली. सदर गुन्हयाचा पुढील तपास परि. पोलीस उपअधिक्षक श्री श्याम पानेगावकर, व सायबर पोलीस पथक तपास करीत आहेत.

मा. पोलीस अधीक्षक सोो श्री. समिर शेख, मा. अपर पोलीस अधिक्षक सो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोो वाई विभाग वाई श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर, पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे दुय्यम अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज.म.पो.कॉ वर्षा खोचे सायबर कॅन्सलटंट, जय गायकवाड अॅड रोहन सारडा यांच्या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. मा. पोलीस अधिक्षक सो श्री. समिर शेख, मा. अपर पोलीस अधिक्षक सो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हेप्रकटीकरण विभागाचे व सायबर पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट