मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत अर्नाळा व नालासोपारा पोलीस ठाणे तर्फे सायबर जनजागृती उपक्रम संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
अर्नाळा:

मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अर्नाळा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये सायबर गुन्हयांचे अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजीत करणे बाबत मा. पोलीस आयुक्त यांनी आदेशित केलेले होते. मा. पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतून मा. श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३. श्री. चंद्रकांत जाधव, सहा. पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाने अर्नाळा व नालासोपारा पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ११/०८/२०२३ रोजी सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन अर्नाळा पोलीस ठाण्याचे हददीतील के.जी. हायस्कुल, आगाशी या ठिकाणी सकाळी ११-०० ते १२- ३० वाजे पावेतो करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मार्गदर्शन करण्याकरीता सायबर गुन्हे सेल मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातुन अॅड. श्रीमती शाहीशा दलाल, श्री. परब यांना पाठविण्यात आले होते सदर वेळी त्यांनी कार्यक्रमाचे पथनाटयामध्ये सहभागी झालेल्या खालील टिमचे सादरीकरण बघुन त्यांचे मुल्यांकण करुन त्यांची प्रथम, द्वितीय, तृतीय अशी निवड केली सदर वेळी खालील प्रमाणे एकुण ०८ शाळा-महाविद्यालयांनी भाग घेतला होता.
शाळेचे / महाविद्यालयाचे नांव

१) CS-01 सेंट जोसेफ कॉलेज, सत्पाळा
२) CS-02 हॅरीस ज्युनीअर कॉलेज सोपारा गांव नालासोपारा प. ग्रुप ०१
3) CS-03 के. जी. हास्कूल, आगाशी
४) CS-04 हॅरीस ज्युनीअर कॉलेज सोपारा गांव नालासोपारा प. ग्रुप ०२
५) CS-05 सेंट जोसेफ हायस्कूल नंदाखाल
६) CS-06 रायन इंटरनॅशनल स्कूल विरार प ग्रुप – ०१
७) CS-07 मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूल विरार प.
८) CS-08 रायन इंटरनॅशनल स्कूल विरार प. ग्रुप – ०२
वरील पैकी खालील प्रमाणे शाळा-महाविद्यालये यांना अर्नाळा पोलीस ठाण्या तर्फे नालासोपारा विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री. चंद्रकांत जाधव यांचे हस्ते सन्मानचिन्ह व बक्षिस पत्र व प्रमाणपत्र देवुन गौरवियात आले
अ.नं. कोड नं. क्रमांक शाळेचे / महाविद्यालयाचे नांव
१) CS-01 तृतीय क्रमांक सेंट जोसेफ कॉलेज, सत्पाळा
२) CS-05 द्वितीय क्रमांक सेंट जोसेफ हायस्कूल नंदाखाल
७) CS-07 प्रथम क्रमांक मुलजीभाई मेहता इंटर नॅशनल स्कूल विरार प.
सदर कार्यक्रमा करीता मा. श्री. चंद्रकांत जाधव सहा. पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह बागल, नालासोपारा पोलीस स्टेशन, श्री. कल्याणराव कर्पे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्नाळा पोलीस ठाणे, मुख्याध्यापक श्रीमती वाळीजकर मॅडम व वरील सर्व शाळांतील शिक्षक गण व महाविद्यालयातील ४५० ते ५०० विद्यार्थी उपस्थित होते त्यांना सायबर गुन्हयां संदर्भात घावयाची दक्षता बाबत योग्य ते मार्गदर्शन करुन मा. सहा. पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग यांचे आदेशांन्वये सदरच्या कार्यक्रमाचा १२-३० वाजता सांगता समारोप करण्यात आलेला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com