सिव्हील हॉस्पीटल, मिरज येथून अपहरण केलेले ३ दिवसाचे बाळ ४८ तासात महात्मा गांधी पोलीसांकडून हस्तगत..

0
Spread the love

मिरज

सह संपादक -रणजित मस्के

, एक संशयीत महीला ताब्यात, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या पथकाची कारवाई.

पोलीस स्टेशन

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

गुन्हा घडला तारीख, वेळ व ठिकाण

दि. ०३.०५.२०२५ चे १२.०० वा. चे सुमारास सिव्हील हॉस्पीटल, मिरज

अपराध क्र आणि कलम

गु.रनं. ९६/२०२५ भारतीय न्याय संगीता कलम १३७ (२) प्रमाणे

मुन्हा दाखल तारीख

दि. ०३.०५.२०२४ रोजी

फिर्यादी नाच

कविता समाधान आलदर, वय ३२, रा. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर

माहितीचा स्रोत

बुजाण नागरीका मार्फत सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गिड्ढे पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड

कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार

मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर

मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधिक्षक, सांगली

मा. श्रीमती रितू खोखर, प्रभारी पोलीस अधिक्षक, सांगली

मा. श्री. प्रणिल मिल्दा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग

मा. श्री. सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, सांगली

श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

श्री. सुनिल गिट्टे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी वाहतूक शाखा, मिरज (चार्ज) श्री. पंकज पवार, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. नितीन सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, सांगली यांचे मार्गदर्शानाखाली

पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, सहा. पोलीस उपनिरीक्षक वसंत किर्वे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, अभिजीत पाटील,

सूरज पाटील, रंजना बेडगे, साक्षी पतंगे, पोलीस कॉन्स्टेचल बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, विनोद चहाण, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, रणजीत घोडके

चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, चालक सहा. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कांचाळे

सायबर पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली चोबडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अफरोज पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश आलदर, पोकों कैप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विजय पाटणकर

संशयित नाव व पत्ता सारा सायया साठे, वय २४, रा. डोंगरसोनी रोड, अल्ताफ गैरेज पाठीमाने, सावळज, ता.

तासगांव, जि. सांगली,

गुन्ह्याची बोडक्यात हकीकत :-

मा. श्री. संदीप पुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली, मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे उघडकीस आणणेचाबत वेळोवेळी आदेशीत व मार्गदर्शन केले आहे.

सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत गंभीर गुन्हे करणारे इसमांधाचत माहीती उपलब्ध करुन त्यांचेधर योग्य ती प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचित केले होते.

दि. ०१.०५.२०२५ रोजी सिजील हॉस्पीटल, मिरज येथे प्रसूती झालेल्या महीला नामे कविता समाधान आलदर, रा. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर यांचे तीन दिवसांचे पुरुष जातीचे बाळ एका अनोळखी महीलेने दि. ०३.०५.२०२५ रोजीचे १२.०० वा. चे सुमारास फिर्यादी यांचे अञ्जानपणाचा फायदा घेवून सिव्हील हॅस्पीटल, मिरज येथून अपहरण करून नेलेबाबत महात्मा गांधी चौक पो. ठाणेव गु.र.नं. ९६/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता.

सदरचा गुन्हा हा गंभीर व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील स्वरुपाचा असल्याने तो उघडकीस आणणेचे अनुषंगाने संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तसेच सुनिल गिडे, सहा. पोलीस निरीक्षक, वा.शा, मिरज (धार्ज) यांनी पोलीस ठाणेकडील नमूद पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ नदर गुन्हयाचे घटनास्थळी जावून तांत्रिक माहीती संकलीत करुन तिचे विश्लेषन करून सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत सदर गुन्हयाचे घटनास्थळी जावून तेथील तांत्रिक माहीती संकलीत करुन सदरच्या अनोळखी महीलेचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरु करुन उपलब्ध सीसीटीव्ही फूटेजद्वारे तसेच यातील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून मिळालेल्या माहीतीवरुन सदर अज्ञात महीलेचे रेखाचित्रावरुन शोधपत्रिका तयार करुन ती समाजमाध्यमात व नागरीकांमध्ये त्याचप्रमाणे सांगली जिल्हातील सर्व पोलीस ठाणे, बातारा, कोल्हापूर, सोलापूर या शेजारील जिल्हयात तसेच कर्नाटक राज्यातही प्रसारीत केली होते.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे नमूद पोलीस पथक हे उपलब्ध तांत्रिक माहीतीवरुन सदरच्या अनोळखी महीलेचा शोध घेत असताना पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गिडे व पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांना एका सुजाण नागरीकाने पोलीस ठाणेने प्रसारीत केलेल्या शोधपत्रिकेतील माहितीचे आधारे, महीला नामे सारा सायबा साठे हीनेच सदरचे तीन दिवसाच्या बाळाचे सिचील हॉस्पीउन, मिरज येथून अपहरण केले असून ती सध्या सावळज, ता. तासगांव, जि. सांगली येथे सदरचे बाळासह वास्तव्यास आहे, अशी खात्रीशीर माहीती दिली. सदर बातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज व सुनिल गिद्धे, सहा. पोलीस निरीक्षक, वा.शा, मिरज (चार्ज) यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथकास रचाना करून सदर महोलेस ताब्यात घेवून तिचेवर योग्य ती कारवाई करणेचे आदेश दिले.

वरील प्रमाणे नमूद पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे सावळज, वा. तासगांव येथे जावून तीन पथकात विभागून सदरच्या महीलेची स्थानिक नागरीकांकडून माहीती काढून तिस पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून तिचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता सदरचे तीन दिवसाचे बाळ सुखरुपरीत्या मिळून आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करीत आहेत.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथकाने कोणताही ठोस पुरावा नसताना सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा असा सदरचा गुन्हा घडले वेळेपासून अवघ्या ४८ तासाचे आत उघडकीस आणून सदरचे तीन दिवसांचे अपहारीत बाळ सुखरुपरीत्या हस्तगत करुन ते यातील फिर्यादी यांचे ताब्यात देवून एका आईची तिचे बाळासोबत भेट घडवून कर्तव्य व सामाजिक भान एकत्रितरीत्या कसे जोपासावे याचे उत्तम उदाहरण समाजापुढे सादर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट