अपंग गर्भवती स्त्रीचा ढासगड जंगलात कोयत्याने निर्घृण खून करणाऱ्या तिघांना गोंदिया न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा…
उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– ▶️ आरोपी नामे:-
1) मो. समीर अस्लाम शेख, वय 26 वर्ष, रा. वार्ड क्र. 4, बाजार वार्ड लाखनी, जिल्हा – भंडारा
2) आशिफ शेरखाँ पठाण, वय 38 वर्ष, रा. बाबा मस्तानी, जिल्हा – भंडारा
3) प्रफुल्ल पांडुरंग शिवणकर, वय 25 वर्ष, रा. दुधा, पो. डबा, ता. उमरेड, जिल्हा – नागपूर

अशी जन्मठेप झालेल्या आरोपीतांची नावे असून या तिघांनीही घटना ता. 23-07-2021 चे 08.00 वाजता सुमारास एका अपंग गर्भवती अनओळखी महिला वय अंदाजे 25 ते 30 वर्ष हिला धारदार हत्याराने गळा कापून तिला रोडवर जीवानिशी ठार करून रोडाने बाजूला ओडत नेवून ढासगड जाणाऱ्या डांबरी रोडपासून 25 फूट अंतरावर नेवून फेकले आहे ….असे फिर्यादी चे रिपोर्ट वर पोलीस ठाणे चिचगड येथे अपराध क्र. 70/2021कलम 302, 201 (ब), 34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला होता…
⏩ मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपीतांना भंडारा, बुटीबोरी, येथुन गुन्ह्यांत जेरबंद करून गुन्ह्यात अटक करण्यात आली… वरिष्ठांचे मार्गदर्शनात गुन्ह्याचा तपास करण्यात आला….गुन्ह्यात आरोपी यांचे विरूध्द सबळ साक्ष पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, गोळा करून तपासाअंती गुन्ह्याचे दोषारोप पत्र क्र:- 17/2021 दिनांक 07/10/2021 अन्वये. माननीय न्यायालयात न्यायास्तव दाखल करण्यात आले होते… मा. न्यायालयात गुन्ह्याचे से. ट्रा. केस क्र. 130/2021 दिनांक 29/10/2021 प्रमाणे खटला चालविण्यात आला..
⏩ माननीय न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत युक्तिवादानंतर सबळ साक्ष पुराव्यावरून आरोपीतांविरुद्ध गुन्हा केल्याचे दोष सिद्ध झाल्याने माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. वानखेडे साहेब, जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया यांनी आज दिनांक 29-06- 2024 रोजी सदर खटल्याचा न्यायनिवाडा करून गुन्ह्यातील तिन्ही आरोपी यांना जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे..
सदर गुन्ह्याचे तपास कामकाज- ▶️ तपासी अधिकारी :-प्रथम तपासी अधिकारी पोउपनि श्री. मनोहर इस्कापे, पो. स्टे. चिचगड यांनी केले असून
तपासी अधिकारी म्हणून -श्री . जालिंदर नालकुल सा. उप.वि.पो. अधि. आमगांव अतिरिक्त कार्यभार देवरी यांनी केलेले आहे..
▶️ सरकार पक्षातर्फे सदर गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता गोंदिया जिल्हा यांनी काम पाहिले त्यांना ऍडव्होकेट प्रणिता कुलकर्णी यांनी सहकार्य केले. तर सदर गुन्ह्याचे *कोर्ट पैरवी कामकाज :- म.ना. पो. शि. रिम्पी हुकरे, ब.न. १४५२ पो.स्टे. चिचगड यांनी कामकाज पाहिले..
⏩ मा. वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करणारे पोलीस पथक, गुन्ह्याचे तपास अधिकारी, तपास कार्यात मदत करणारे अधिकारी, अंमलदार, न्यायालयात गुन्ह्याची बाजू मांडणारे सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता गोंदिया जिल्हा यांनी काम पाहिले त्यांना ऍडव्होकेट प्रणिता कुलकर्णी, पैरवी काम पाहणारे सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com