12 मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड व 7,05,000/- रूपये किंमतीच्या 12 मोटर सायकल जप्त !!

उपसंपादक-रणजित मस्के
कोल्हापूर :-
मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
मा. पोलीस अधीक्षक साो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रोहीत मर्दाने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना तपास पथकास खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील सांगली जिल्ह्यातील आरोपी दिपक वाघमारे, हा चोरीची स्प्लेंडर मोटर सायकल घेवून दि. 13.12.2024 रोजी शिये, ता. हातकणंगले गावचे हद्दीत रामनगर येथे येणार आहे.
मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि. 13.12.2024 रोजी सापळा लावून आरोपी नामे दिपक पांडुरंग वाघमारे, व.व.31, रा.चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. शिरटेकर चाळ, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली यास नंबर प्लेट नसलेल्या काळे रंगाचे स्प्लेंडर मोटर सायकलसह ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली स्प्लेंडर मोटर सायकल ही चोरीची असून सदर बाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, गु.र.नं. 455/2024, भा. ना. सं. कलम-303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असलेची माहिती मिळाली. म्हणून त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असलेने त्याचेकडे कौशल्यपुर्ण अधिक तपास केला असता त्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून एकूण 12 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितली. सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 7,05,000/- रुपये किंमतीच्या 12 मोटर सायकली हस्तगत केल्या असून आरोपीकडून उघडकीस आले
नमुद आरोपी दिपक पांडुरंग वाघमारे याचेविरुध्द यापुर्वी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात एकूण 22 मोटर सायकलचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रोहीत मर्दाने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने, संजय पडवळ, युवराज पाटील, अमित सर्जे, राजेंद्र वरंडेकर व सायबर पोलीस ठाणेकडील सुहास पाटील यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com