प्रवाशाचे रिक्षामध्ये अनावधानाने राहिलेले १,००,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने २ तासात परत मिळविण्यास गुन्हे प्रकटीकरण शाखा, विरार यांना मोठे यश…

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

विरार:-

        दिनांक २६/०८/२०२३ रोजी दुपारी ०३.०० वा.चे सुमारास इसम नामे - धीरज सुरेश चौरसिया,रा.रुम नं-८, गुमाभवन चाळ, मकवाना, गोपचरपाडा हे विरार मकवाना येथुन विरार स्टेशन पर्यंत प्रवाशी रिक्षात बसले. त्यांच्या जवळ एक लेदरची बॅग होती त्यामध्ये १,००,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने बॅगमध्ये ठेवलेले होती. त्यांची सोन्याचे दागीन्याची बॅग रिक्षामध्येच विसरले असले बाबत पोलीस ठाण्यात ०४.०० वा. कळविल्याने विरार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे दालनात बोलावुन योग्य त्या सुचना देवुन सदर रिक्षाचा व रिक्षा चालकाचा शोध घेणेकामी रवाना केले.

      गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी / कर्मचारी यांनी संबंधीत रिक्षा स्टॅण्डवर जावुन सदर ठिकाणी असलेल्या रिक्षा चालकांकडुन येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षाचे सीसीटीव्ही फुटेज बघुन रिक्षाचा नंबर प्राप्त करुन आजुबाजुच्या रिक्षा चालकांना सदर रिक्षावाल्याबाबत विचारले असता, त्यांनी सदर रिक्षा चालक यांचे नांव व मोबाईल नंबर दिला असता, त्या रिक्षा चालकास बोलावुन त्याच्या रिक्षा मध्ये विसरलेली सोन्याच्या दागिन्याची बॅग मिळुन आल्याने ती चेक करुन पाहिले असता त्यामध्ये १,००,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळुन आले.

    सदरचे सोन्याचे दागीने मंगळसुत्र, कर्णफुले व बॅग ही मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र कांबळे, प्रभारी अधिकारी, विरार पोलीस ठाणे यांनी धीरज सुरेश चौरसिया, यांचेकडे सुपूर्द केली.

    सदरची कामगीरी श्री.सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, श्री. रामचंद्र देशमुख, सहा पोलीस आयुक्त, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे व. पो. नि. श्री. राजेंद्र कांबळे, स.पो.नि.ज्ञानेश फडतरे, पो. हवा. सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, पो. अं. मोहसिन दिवान, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, सचिन बळीद, प्रफुल्ल सोनार यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट