मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाजवळ रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्याला गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-३ ने ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:– मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला नुकतेच रिव्हॉल्व्हरसह अटक करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३च्या पथकाने आणखी एक कौतुकास्पद कामगिरी केली.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी आलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीकडून १ रिव्हॉल्व्हर व २ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

   मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे  एक जण रिव्हॉल्व्हर विकण्याकरीता येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३ ला प्राप्त झाली. त्यानुसार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकजवळ सापळा लावण्यात आला. त्यावेळी तेथे आलेल्या एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेता, त्याच्याकडे १ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर (सिक्सर) व २ जिवंत काडतूस  मिळाले.  चौकशीदरम्यान त्याने स्वत:चे नाव फारुक जाफर शेख (वय ४५ वर्षे, धंदा-नाही, रा. ठि. रुम नं. २१, पारसी चाळ, १४ थी लेन, कामाठीपुरा, मुंबई सेंट्रल, मुंबई ०८ / मुळ गाव नखास, अजगर अली अकबर अली कोटीच्या बाजुस, लखनऊ चौक, लखनऊ, उत्तर प्रदेश) असे सांगितले.

तसेच त्याच्या विरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात मारामारीचे अनेक गुन्हे नोंद असल्याचे समजले.

   या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३ ने गु.र.क्र. १४/२०२४, कलम ३, २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३७ (१) (अ), १३५ म.पो.का. (नागपाडा पोलीस ठाणे सी. सी. टी. एन. एस.क्रं. १७२/२०२४) नुसार गुन्हा दाखल केला. शेख याने रिव्हॉल्व्हर कोठून आणले?, कोणाला विकणार होता त्याचा पोलीस तपास करत आहेत. 

ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,  विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे)  लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण)  दत्ता नलावडे व सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य)  चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष- ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे, सपोनि समीर मुजावर, हवालदार विनोद परब, वैभव गिरकर, अंमलदार विकास चव्हाण, यल्लप्पा तांबडे यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट