गुन्हे प्रकटीकरण शाखा (डी.बी.) कराड शहर पोलीस ठाणेची धडाकेबाज कारवाई २ मोटार सायकल चोरटे अटक, चोरीच्या ०६ मोटार सायकली जप्त एकूण ०६ गुन्हे उघड

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा – कराड:- मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर सो सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर सो व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील कराड शहर पो.ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत होणाया मोटार सायकल चोरीच्या शोध अनुषंगाने गुन्हे उपड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करणेत आलेले होते. सदरचे विशेष पथक नमुद अनुषंगाने कराड शहर पो. ठाणे हद्दीत व परिसरात मोटार सायकल चोरांचा शोध घेत होतो.
दि.११/०६/२०२३ रोजी पाढती मोटार सायकल चोरी अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची रात्री २२.०० ते १४.०० वा. पावेतो गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग में नाकाबंदी नेमली होती. कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील मोटार सायकल चोरीचा तपास करत होते. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि श्री. डांगे यांचेसह पोलीस पथक कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना दोन इसम संशयीतरित्या मोटार सायकलवरून फिरत असताना मिळून आले त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलीस ठाण्यात घेवून आले असता त्याचेकडे विश्वसात घेवून विचारपुस केली असता त्यांनी दि. २१/०६/२०२३ रोजीच नमुद गाड़ी चोरल्याचे निष्पन्न झाले तसेच कराड शहर पोताणे अभिलेख तपासला असता कराड शहर पो.ठाण्यात गुरनं ५४८ / २०२३ मासिक ३७९ प्रमाणे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी इतर ०५ मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. नमुद पैकी ०४ मोटार सायकल निवेदन पंचनाम्याने ताब्यात घेतल्या असून ०१ गाडी तळबीड पो.ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या मोटार सायकल पैकी कराड शहर पो. ठाण्यात ०२, आष्टा पो.ठाणे जि. सांगली येथे ०१, विटा पो.ठाणे जि. सांगली येथे ०१ व इतर दोन मोटार सायकल बाबत माहिती पेणे सुरू आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक रघुवीर देसाई है।

करत आहेत. सदरची कामगिरी ना. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर सो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर साहेब व फराड शहर पोलीस ठाण्याचे सातारा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. राजू डांगे, सफी रघुवीर देसाई, पोलीस नाईक संजय जाधव, किशोर तारळकर, आनंदा जाधव, महेश शिंदे, रईस सय्यद, अमोल देशमुख, सोनाली मोहिते यांनी केलेली आहे.
आरोपीची नावे :-
(१) सुनिल ताराचंद चव्हाण वय २० वर्ष, रा. उत्तर पार्ने ता.कराड जिल्हा सातारा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com