गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-१५ अवैध अग्निशस्खे व २८ जिवंत राऊंड जप्त केले तसेच १८ अवैध गावठी दारुच्या हातभट्ट्या केलया नेस्तनाबुत .

आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ ये अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होवु नये यासाठी अवैध शस्खे बाळगणारे व विक्री करणारे यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे तसेच अवैध गावठी दारु निर्मिती व विक्री करणारे यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना गुन्हे शाखेचे अधिकारी यांना दिल्या होत्या.

मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे सुचनांप्रमाणे विधानसभा निवडणुक-सन २०२४ चे अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विशेष मोहिम राबवुन, त्यांनी अहोरात्र मेहनत केली असुन, त्यांचे मेहनतीस यश प्राप्त झाले असून, अवैध अग्निशखांचे संबंधात खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. १) घटक-१

, ठाणे, गुन्हे शाखा यांनी राबोडी पो.स्टे. व शिळ-डायघर पो.स्टे. चे हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे शिवमकुमार रामकिशन व पपिलकुमार सत्रोहन लाल दोन्ही रा. लखीनपुर, उत्तरप्रदेश तसेच राहुल उर्फ काळया उर्फ मोहमद गुलजार पिर मोहमद खान रा. शिळ-डायपर, ठाणे याचे ताब्यातुन ०५ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा १,८५,०००/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

२) घटक-२, भिवंडी, गुन्हे शाखा यांनी भिवंडी शहर पो.स्टे. व शांतीनगर पो.स्टे. चे हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे श्रीकांत दत्ता वाघमारे रा. नवी वस्ती, भिवंडी व तुर मोहमद हनिफ अन्सारी, रा. डोंगरपाडा, भिवंडी याचे ताब्यातुन ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत राऊंड असा १,७०,६००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

३) घटक-५, वागळे इस्टेट, गुन्हे शाखा यांनी वागळे इस्टेट पो.स्टे. ये हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे सुमित चंद्रकांत पवार रा. वागळेइस्टेट, ठाणे याचे ताव्यातुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०७ जिवंत राऊंड असा ११२,१२०/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

४) घटक-३, कल्याण, गुन्हे शाखा यांनी मानपाडा पो.स्टे.चे ह‌द्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे दिपक भिमाया कोळी रा. पिसवली, डोंबिवली पूर्व याचे ताब्यातुन ०३ गावठी बनावटीचे पिस्टल व ०७ जिवंत राऊंड असा ७५,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

५) घटक-४, उल्हासनगर, गुन्हे शाखा यांनी शिवाजीनगर पो.स्टे. व हिललाईन पो.स्टे. चे हद्‌दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे गणेश सुरेश लोंवे, रा. ज्योती कॉलनी, उल्हासनगर व भगवान संभाजीत यादव रा. कात्रपपाडा, बदलापुर याचे ताब्यातुन २२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा ५१,५००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ६) खंडणी विरोधी पथकाने राबोडी पो.स्टे.ये ह‌द्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे अब्दुल कलाम सलाम खान, रा. कुर्ला, मुंबई याचे ताब्यातुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत राऊंड असा ५०,०००/-रु किमतीचा मुद्दे‌माल जप्त करण्यात आलेला आहे.

७) मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने फळवा पो.स्टे. ह‌द्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे अमरसिंग भगवान सिंग रा. खारेगांव, कळवा याचे ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा ६०,९००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर कारवाईमध्ये एकुण १५ गावठी बनावटीचे पिस्टल व २८ जिवंत राऊंड असा एकुण ७,०५,१२०/-रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

तसेच अवैध गावठी दारु निर्मिती व विक्रीच्या संदर्भात गुन्हे शाखेचे सर्व घटकांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत एकुण १८ हातभट्ट्या उध्वस्त करुन त्यात एकुण ४९,७८८ लिटर वॉश व गावठी दारु असा एकुण २५,३०,१५०/- रु चा माल नष्ट केला आहे. तसेच गावठी हातभट्टी दारु तसेच अवैधरित्या विदेशी दारु विक्री करण्याबाबत १३१ कारवाया करुन त्यांचेकडुन एकुण ९,००,५९३/-रु ची ५३५२ लीटर दारु पकडण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर, मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध२. गुन्हे, ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १. गुन्हे, ठाणे, मा. धनाजी विरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रतिबंध, गुन्हे, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सर्व पटक कक्षाचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट