सदनिका देण्याचा बहाण्याने ९ : ५० कोटी रुपयांची फसवणुक करुन ४ वर्षे फरार असलेल्या आरोपीतस ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नालासोपारा :- सन २०१२ ते दि.१२/०३/२०२० रोजी पावेतो आरोपीत नामे ड्रीम निर्माण बिल्डींगचे मालक चांद हनिफ शेख व पृथ्वी डेव्हलपर्सचे भागीदार चंद्रकांत पटेल, पवन तिवारी, मुन्ना शर्मा व ब्रिजेश मौर्या यांनी आपसांत संगणमत करुन एकूण ४३ सामान्य नागरीक यांचेकडून एकूण ९.५० कोटी रुपये रोख व चेकव्दारे घेवुन फिर्यादी च साक्षीदार यांना रजिस्ट्रेशन करुन न देता त्यांचे पैकी कोणालाही विहीत वेळेत सदनिकेचा ताबा न देता फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणुक केली आहे म्हणुन नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १०४/२०२० भा.द.वी.सं कलम ४२०, ३४ सह मोफा अधिनीयम कलम ३, ४ व १३ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबधांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा नोंद असुन गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालयातील गंभीर गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेणे बाबत दिलेल्या सूचना व आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष३ व्दारे करीत असतांना सदर गुन्हयातील आरोपी यास तांत्रीक विश्लेषण व प्राप्त गोपणीय बातमीवरुन आरोपीत नामे ब्रिजेश विद्याप्रसाद मोर्या, रा. अल्कापुरी, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर यास ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राथमिक तपास करता आरोपीत ब्रिजेश विद्याप्रसाद मोर्या हा खालील गुन्हयात पाहिजे आरोपीत
म्हणून निष्पन्न होत आहे.

पोलीस ठाणे

गुन्हा रजि नंबर व कलम

नालासोपारा पोलीस ठाणे

१०४/२०२० भा.द.वी.सं कलम ४२०, ३४ सह मोफा अधिनीयम कलम ३, ४ व १३ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे

नालासोपारा पोलीस ठाणे

२८०/२०१८ भा.द.वी.सं. कलम ४२०, ४०६, ३४ सह मोफा अधिनीयम कलम ३, ४ व १३ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबधांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३.४ प्रमाणे

नालासोपारा पोलीस ठाणे

३७६/२०२३ भा.द.वी.सं. कलम ४२०, ४०६, ३४ सह मोफा अधिनीयम कलम ३, ४ व १३ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबधांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे

नालासोपारा

१३३/२०१६ भा.द.वी.सं. कलम ४२०, ३४ प्रमाणे

पोलीस ठाणे

२०५/२०१६ भा.द.वी.सं. कलम ४२०, ४६५, ४६८,४७१, ३४ प्रमाणे

नालासोपारा पोलीस ठाणे

उक्त आरोपी यास पुढील कारवाई करीता नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि नंधर १०४/२०२० भा.द.वी. से कलम ४२०, ३४ सह मोफा अधिनीयम कलम ३, ४ व १३ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे या गुन्हयात आर्थिक गुन्हे शाखा येथे हजर करण्यात आले असुन त्यास दिनांक २६/०८/२०२४ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजूर आहे.

उपरोक्त कामगिरी श्री. मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक/प्रमोद बडाख, पोउपनिरी/ उमेश भागवत, ज्ञानेश्वर आव्हाड, सफी/अशोक पाटील, पोहवा/मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पो.अं. / राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, म.सु.ब/ प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष ३ तसेच सफी / संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट