पोलीस मुख्यालय गोंदिया येथे सीपीआर (CPR-Cardio Pulmonary Resuscitation) चे प्रशिक्षणाचे आयोजन..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- गोंदिया जिल्हा पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदारांकरिता आयुष क्रिटीकल हॉस्पोटल गोंदिया यांच्या वतीने दिनांक २७/०८/२०२४ रोजी “प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांचे मार्गदर्शनाखाली सीपीआर (CPR- Cardio Pulmonary Resuscitation) जनजागृती आरोग्य संबंधाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर जनजागृती प्रशिक्षणात आयुष क्रिटीकल हॉस्पीटल गोंदिया येथील प्रमुख वक्ते डॉ. जितेंद्र गुप्ता, डॉ. लक्ष्मी गुप्ता, डॉ. अर्युव गुप्ता व एक्सुकेटिव्ह श्री शिशुपाल ठाकुर यांच्या गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले.

सदर कार्यशाळेत प्रमुख वक्ते डॉ. जितेंद्र गुप्ता यांनी संबोधित करुन हृदयरोग ही एक प्रमुख आरोग्य समस्या असुन वेगाने पसरत जाणारा रोग आहे. दरवर्षी हॉर्ट अटॅक मुळे हजारो लोक मृत्यु पावतात. त्याकरिता सीपीआर देण्याची एक विशिष्ट पध्दत असते. जिचा वापर करुन अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो. सीपीआर देण्यासाठी कुठल्याही प्रकारची इंजेक्शन किंवा औषधांची गरज भासत नाही. ज्या व्यक्तिची हृदयाची गती मंदावली आहे, ती पुर्ववत होईपर्यंत छातीवर दाब दिला जातो. यामुळे शरिरातील रक्तप्रवाह सामान्य होण्यास मदत होते. सीपीआर चो गरज आहे किंवा नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सापीआर ही साधीसोपी आपत्कालीन उचपार प्रक्रिया आहे, मात्र त्यासाठी बेसिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. अशा परिस्थतीमध्ये त्याचा वापर कसा करावा व सीपीआर कसा दयायाचा याबाबत त्यांनी व सोबत असलेले डॉक्टरांनी उपस्थितांना प्रात्याक्षिके असे अतुलनीय योग्य उदाहरण दिले. त्याप्रमाणे विज्ञान प्रगत झाल्याने आता हॉर्ट अटैक पासुन वाचवणारे उपचारही आले आहेत. हृदयरोगामुळे आपल्या शरीरास कुठ-कुठले दुष्परिणाम होतात, ते टाळण्यासाठी आपण काय गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे याबाबत माहिती सांगुन शरीर निरोगी राहण्याकरिता सखोल असे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिले. सदर कार्यशाळेत जवळपास एकुण १४५ च्या संख्येने पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणाचे सुत्र संचालन पोहवा राज वैद्य व आभार प्रदर्शन प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (मुख्या) श्रीमती नंदिनी चानपुरकर यांनी केले. सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्याकरिता रापोनि रमेश चाकाटे, राखीव पोलीस निरीक्षक श्री रमेश चाकाटे, श्रेणी पोउपनि रोशन उईके, सफौ मुस्तफा सरवर, पोहवा पंकज पांडे, मपोहवा मंगला प्रधान, पोहवा हुर्मेंद्र चौधरी, राज वैद्य तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी आय स्टॉफ यांनी अथक परिश्रम घेतले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट