पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून ६५,०००/- रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा:- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बेकायदा बिगर परवाना स्वतःचे जवळ पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्या अनुशंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून त्यांना अवैध शस्त्रांचाच कारवाई करण्याचे आदेश दिले.
दि.२८/०९/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अक्षय सुरेश भोसले राजानजाईनगर सातारा हा मोळाचा ओढा निकी बट इंटिलचे समोर उभा असून त्याचे जवळ पिस्टल आहे. त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे पथकास देवून त्यांना नमुद इसमास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नमुद तपास पथकाने मोळाचा ओढा निकी इंटस हॉटेल जवळ जावून सापळा लावून बातमीमधील इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये ६५,०००/- रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल मिळून आल्याने ती हस्तगत करून त्याचे विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ३९५/२०२३ भारतीय हत्यार अधिनियम ३२५ अन्वये नोंद केला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ४० देशी बनावटीची अग्निशस्त्रे व ५५ अन्त करण्यात आलेली आहेत.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, विशाल भंडारे, पोलीस अंमलदार अतिश पाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, सैलेश फडतरे, शरद बेवले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, मनोज जाधव, अमित माने, स्वप्नील कुमार, मोहन पवार, गणेश कापरे, प्रविण कांबळे, विक्रम पिसाळ, ओंकार यादव, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
आरोपीचे नाव
अक्षय सुरेश भोसले वय 32 वर्ष राहणार तामजाईनगर, सातारा
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com