श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. दि.०३/०५/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गोपनिय
माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी हितेश सुरेश मानकर हा त्याचे साथिदारांसह स्प्लेंडर मोटार सायकल क्र. MH-11-2-6278 वरुन शिरवळ गावचे हद्दीतील सातारा ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ चे सर्व्हिस रोडवर फुलमळा नावचे शिवारात असले हॉटेल जय श्रीरामचे समोर देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरीता येणार आहेत, त्याअनुशंगाने त्यानी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना नमुद इसमांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी जावून सापळा लावून नमुद इसमास ताब्यात घेतले असता त्याचे अंगझडतीमध्ये ६५,०००/-रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द शिरवळ पोलीस ठाणे गु.र.नं. १०२/२०१३ मा.ह.अ.क. ३(१) २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ३२ देशी बनावटीची अग्निशरखे व ४० काडतुसे जप्त करण्यात
आलेली आहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, सुधीर बनकर, अतिष घाडगे, संतोष पवार, संजय शिर्क, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेचले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पचार, विशाल प्रचार, विक्रम पिसाळ, अमित सपकाळ, प्रविण कांबळे, प्रमोद सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, शिवाजी गुरच यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा