देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणा-या इसमास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे ;-
दि.०६/११/२०२४ रोजी १६/३० वा.चे. सुमारास सहा. पोलीस निरिक्षक राहुल कोलंबीकर, पो. अर्मलदार सुधीर इंगळे, संदीप घुले, सुजय पवार असे मा. वरीष्ठांचे आदेशाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने अवैद्य धंदे, रेकॉर्ड वरिल आरोपी चेक करणे व गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना मा. वपोनि युवराज नांद्रे स्वारगेट पो.स्टे. यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरिल गुन्हेगार नामे श्याम युवराज उमाप हा पिस्तोल विक्रीसाठी कॅनॉल रोड गुलटेकडी येथे उप मृदा सर्वेक्षण कार्यालयाचे कंपाऊंडच्या बाहेर उभा आहे. अशी माहीती मिळाली असत्ता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन बातमी प्रमाणे इसम मिळुन आल्यास पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
ल्याप्रमाणे सहा. पो. निरिक्षक राहुल कोलंबीकर यांनी नमुद पोलीस स्टाफसह बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करुन सापळा रचुन रेकॉर्ड वरिल गुन्हेगार नामे श्याम युवराज उमाप वय २४ वर्षे रा. मिनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी पुणे यास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कडे ०१ गावठी पिस्तोल व ०२ जिवंत काडतुसे असा एकुण २१,०००/-रु.चा माल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं.४७६/२०२४ भारतीय हत्यार कायदाकलम ३(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) (४) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशनचे श्री युवराज नांद्रे, यांच्या आदेशान्वये सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबिकर, पोलीस उप निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अमंलदार सुधीर इंगळे, संदीप घुले, सुजय पवार, रमेश चव्हाण, तनपुरे, फिरोज शेख, दिपक खेदाङ, हर्षल शिंदे, दुधे, मोराळे, टोणपे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com