कोकरूड येथे सेफ स्ट्रीट उपक्रमाचा शुभारंभ..

सह संपादक – रणजित मस्के
सांगली

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकरूड पोलिस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत कोकरूड नाका चौक ते कोकरूड कॉलनी पर्यत चा रस्ता सेफ स्ट्रीट म्हणून घोषित करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ माझ्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कोकरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयवंत जाधव, मा. विकास नांगरे,विकास देशमुख,उपसरपंच अंकुश नांगरे, मोहन पाटील, श्रीरंग नांगरे, सुरेश पाटील,यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
