ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लि. मधील कंत्राटी कामगारांचं निषेध आंदोलन !
उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई दिनांक २८/०३/२०२३ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ए.आय.एअरपोर्ट सर्व्हिसेस.लि. मध्ये १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या मागण्यांचा कामगार युनियनच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करत होते, कायद्यात बसणाऱ्या मागण्यादेखील व्यवस्थापन पूर्ण करण्यास सहमत नव्हते, आणि कामगारांच्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत होते, कामगारांच्या प्रति या असंवेदनशील व्यवहाराचा कामगारांमध्ये अत्याधिक रोष निर्माण झाला होता.


त्यामुळे आज अखिल भारतीय एकता कामगार संघाचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. मिलिंद र तुळसकर. साहेब यांच्या नेतृत्त्वात असंख्य कंत्राटी कामगारांनी कायदेशीररीत्या , काळ्या फिती लावून व्यवस्थापनाच्या विरोधात आपला निषेध नोंदवला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com