महाड मध्ये एका ५५ वर्षीय श्री. सुरेश काशिराम बेटकर यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल..

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:– रविवार दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठिक ७ वाजताच्या सुमारास महाड तालुक्यातील नाते येथील चव्हाणआळी येथुन रहात्या घरातून श्री. सुरेश काशिराम बेटकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ते वय वर्ष ५७ वर्षाचे असून मंडप डेकोरेशनचे कापड आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील गोरेगांव येथे जातो असे सांगून गेले ते अद्याप पर्यंत परत आले नाहीत.
त्यामुळेच त्यांचा मुलगा स्वप्नील सुरेश बेटकर याने महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या हरवले असल्याची तक्रार दाखल केली आहे.

याबाबतचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार श्री. पवार करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com