पालघर मध्ये मध्यरात्री पाण्याचे मिटर चोरी केलेल्या भुरट्या चोरटय़ांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:- पालघर शहरामध्ये अज्ञात चोरट्यांनी पाण्याचे मीटर चोरी करून पळ काढल्याची घटना घडली आहे.

पालघर पूर्व येथील डॉ.आंबेडकर नगर गावामध्ये अंदाजे रात्रीच्या १ते २ वाजताच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी एकुण २ ते ४ घराच्या बाहेर पिण्याच्या पाण्याला जोडले असलेले पाणी मीटर चोरट्याने लंपास केल्याची घटना पालघर (पूर्व )आंबेडकर नगर या ठिकाणी घडले आहे.

तसेच गावातल्या ग्रामस्थांनी ही एक गंभीर बाब असल्याने जवळच्या पालघर पोलीस ठाणे अज्ञात चोरट्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना जेरबंदकरून करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट