किरकोळ कारणावरून परप्रांतीय कामगाराला केलेल्या मारहाणीचीएमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

उपसंपादक :- राकेश देशमुख
महाड:
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बिरवाडी कुंभारवाडा या ठिकाणी प्रभाती कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये कैलास भागीरथी नायक हा परप्रांतीय कामगार राहत असून कंपनीमध्ये काम करून आल्यानंतर सायंकाळी कॉम्प्लेक्स मधील दुकानासमोर खुर्चीवर बसून मोबाईल मध्ये सिनेमा बघत असताना दिलीप लक्ष्मण शेटे यांनी त्यांची गुरे घेऊन जाताना गुरांच्यासाठी असलेले हातातील भरीव काठी रस्त्यावर असलेल्या चिखलामध्ये मारले.
त्यामुळे तो चिखल कैलास नायक या परप्रांतीय कामगारांच्या अंगावर उडाले याचा जाब विचारले असता दिलीप शेटे यांनी मोठ्या आवाजाने ओरडत धमकी देत कामगाराच्या डाव्या हाताच्या दंडावर फटका मारल्याने जखम व वळ उठली आहे.
याबाबत परप्रांतीय कामगारांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्याकडून भादवी कलम 324, 504, 506 अंतर्गत दिलीप लक्ष्मण शेटे याच्यावर गुन्हा दाखल असून प्रभारी अधिकारी मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामचंद्र अंबर्गे हे अधिक तपास करीत आहेत.
सदर घटनास्थळाचा पोलीस हवालदार अंबर्गे व पोलीस शिपाई सुनील पाटील यांनी पंचनामा केला आहे. संबंधित आरोपीवर यापूर्वी देखील पोलीस ठाण्यामध्ये इतर गुन्हे दाखल असून गणेशोत्सवाच्या सणांमध्ये कोणीही गैरवर्तन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रभारी अधिकारी मारुती आंधळे यांनी दिला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com