महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या अनेक फसवणूकीबाबत विशेष मार्गदर्शन..

सह संपादक -रणजित मस्के
सांगली



सदर प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये सर्व मुला मुली नी स्वसंरक्षण कसे करावे, सोशल मिडीया मध्ये व्हॉटसअप, इन्स्टाग्रॅम, फेसबुक, स्नॅपचॅट यांचा कमीत कमी व सुरक्षित वापर करणेबाबत तसेच, ऑनलाईन गेमीग करणार नाहीत तसेच वेगवेगळया साचबर गुन्हयामधुन होणा-या ऑनलाईन फसवणुक होवू नये म्हणून मार्गदर्शन करण्यात आले.
अंमली पदार्थाचे सेवन विक्री व वाहतुक करणे ह गुन्हा असून त्याव्दारे पुढील भविष्य कसे बरबाद होते याबाबत मार्गदर्शन करुन त्यापासून दूर राहणेबाबत आवाहन करण्यात आले. शाळा व महाविदयालयामध्ये असे प्रकार आढळून आल्यास तात्काल शिक्षकांना संपर्क करणेचाबत आवाहन करण्यात आले.
पोक्सो कायदयातील कलमे समजावुन सांगुन गुड टच, बंड टच तसेच नविन कायदयाची माहिती देण्यात आली. पोलीस ठाणेस चालगारे कामकाज तसेच मुलीना मदत कशी मिळेल याबाबत माहिती दिली, एस.टी.बस व गर्दीच्या ठिकाणी होणारी छेडछाड याअनुषंगाने सुरू करण्यात आलेली पोलीस काका व पोलीस दिदी या संकल्पनेची माहिती देवुन निर्भया पथकाचे कामकाजाबाबत माहिती देण्यात आलो. तसंच पोलीस काका व पोलीस दिदी यांचे संपर्क नंबर मुला मुलीना देण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास शिक्षकांना तसेच पालकांना सांगणेबाबत तसेच महिला व मुलांना हेल्पलाईन नंबर ११२, १०९८ यावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
अशा पध्दतीने अशा प्रकारची व्याख्यानपर मालिका यापुढेही प्रत्येक अठवड्याला दर शनिवारी वेगवेगळया शळा महाविदयालयामध्ये चालु ठेवण्याचे मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी सांगितले.