कपडयाचे दुकान फोडणा-या अट्टल चोरटयास भारतीय विद्यापीठ पोलीसानी केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

दि.२८/०३/२०२५ रोजी ते दि. २९/०३/२०२५ रोजी अल्फा मेन्स हब त्रिमूर्ती चौक परदेशी निवास या बिल्डींग मधे शॉप नं ६ या दुकानाचे शटरचे लॉक तोडुन शटर उघडुन दुकानातुन २,३२,०००/- रुपयांचे कपडे व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या इरादयाने स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता चोरुन नेले म्हणून फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर १८७/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५, ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबतच्या मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगावकर यांनी तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार हे शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सुलतान रिजवान शेख, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर २३, शिवनेरीनगर, भगवा चौक, कोंढवा, पुणे याने केल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी त्याचा शोध घेत असताना तो कोंढवा शिवनेरीनगर, पुणे येथे मिळून आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक ०२/०४/२०२५ रोजी अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे केले तपासामध्ये त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार याचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी केले मालातील १५,०००/- रुपयांचे कपडे जप्त करण्यात आले असुन उर्वरीत मालाबाबत आरोपीकडे तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश

पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट