बंद दुकाने, घरफोडी करुन इलेक्ट्रीक राऊटर व MSEB चे पोल वरील अॅल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
प्रतिनिधी-रणजित मस्के
जळगाव: जळगाव जिल्हयांत घरफोडी दुकान फोडीचे व अॅल्युमिनियम तार चोरीच्या गुन्हयांत वाढ झाल्याने मा. एम. राज कुमार सो., पोलीस अधीक्षक सो. जळगाव व मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले.

श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि.२४/११/२०२१ रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, भुसावळ शहरात राहणारे १) शेख शकिल शेख सलीम रा. पंचशिल नगर, भुसावळ व २) शेख आसिफ शेख अकबर रा. मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ यांनी यावल पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याची खात्री लायक बातमी मिळाली आहे. तरी आपण भुसावळ शहरात वरील इसमांचा शोध घेवून ते मिळून आल्यास त्यांचे कडेस घरफोडी चोरीच्या गुन्हयांचायत विचारपुस करून त्यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पोउनि श्री. अमोल देवढे, पोहेका सुनिल पंडीत दामोदरे, अशरफ शेख निजामोद्दीन, दिपक शांताराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, पोना/ किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकों/ विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चापोकों/ मुरलीधर सखाराम बारी सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे पथक तयार करुन त्यांना भुसावळ येथे रवाना केले असता वरील पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील संशयीत यांचा भुसावळ शहरता शोध घेतला असता ते भुसावळ शहरात बस स्टॅण्ड जवळील पोलीस चौकी जवळ रिक्षा स्टॉप जवळ १) शेख शकिल शेख सलीम वय २६ रा. पंचशिल नगर, भुसावळ व २) शेख आसिफ शेख अकबर वय ३२ रा. मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ हे मिळून आले असता त्यांना विचारपुस केली असता त्यांनी १) यावल पो.स्टे. ला CCTNS नं. ४४९/२०२२ भादंवि क. ४५४,४५७, ३८०, (२) पहूर पो.स्टे. CCTNS नं. ३६४ / २०२२ भादंवि क.३८०,४६१, (३) एमआयडीसी पो.स्टे. CCTNS नं. ७३४ /२०२१ भादंवि क.३७९ हे गुन्हे केल्याची कबुली दिलेली असून सदर गुन्हे करतांना त्यांचे सोबत त्यांचे साथीदार ३) वसिम अहमद पिंजारी रा. पंचशिल नगर, भुसावळ, ४) चॅम्पीयन श्याम इंगळे रा. पंचशिल नगर, भुसावळ, ५) श्याम सुभाष शिरसाट ऊर्फ अब्दुल गफ्फुर रा. पापा नगर, भुसावळ, ६) आवेश अहमद पिंजारी रा. पंचशिल नगर, भुसावळ हे सुध्दा असल्याचे त्यांनी कबुल केले आहे. आरोपी १) शेख शकिल शेख सलीम वय २६ रा. पंचशिल नगर, भुसावळ व २) शेख आसिफ शेख अकबर वय ३२ रा. मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ यांना यावल पो.स्टे. CCTNS नं. ४४९/२०२२ भादंवि क. ४५४, ४५७,३८० या गुन्हयांचे पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे वरील पथकाने वरील संशयीतांना कडून ०३ गुन्हे उघडकिस आणून चांगली कामगिरी केलेली आहे. तसेच इतर निष्पन्न आरोपी मिळाल्यावर त्यांचे कडून अजुन बरेच घरफोडी व दुकान फोडीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे अशी माहिती
(किसन गुणपाटील) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com