पालघर पोलीस जिल्हा दलातर्फे स्वच्छ्ता व जनजागृती रॅली अभियानाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
पालघर:
आज दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवारी सकाळी पालघर जिल्हा पोलीस दल आयोजित स्वच्छता व जनजागृती रॅली अभियान राबविण्यात आली.


या अभियानांमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तसेच पोलीस मित्र तसेच अनिरुद्ध बापू भक्तगण व शालेय विद्यार्थी उपस्थित राहून सहभाग दिला.
पालघर पोलीस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रय किंद्रे साहेब यांनी सर्वांचे मन भरून कौतुक केले व सगळ्यांचे धन्यवाद करून आभार मानले.


महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पालघर जिल्हा टीम उपस्थित होते पालघर जिल्हा सल्लागार श्री. संजय राऊत साहेब, पालघर तालुका अध्यक्ष श्री. संदेश मोरे साहेब , पालघर तालुका श्री. किरण पाटील साहेब ,पालघर संघटक श्री. अमोल गायकवाड साहेब, पालघर तालुका कार्याध्यक्ष श्री. स्वामीनाथ निषाद साहेब , पालघर सदस्य दीपक मोरी पालघर सदस्य पंकज मंडल आदि मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती मंगेश अ. उईके पालघर जिल्हा महासचिव यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com