सिनेअभिनेता सैफअली खान यांचे घरात जबरी चोरीच्या उद्देशाने घूसून त्यांचेवर हल्ला करणा-या आरोपीस कशी केली अटक..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई

फिर्यादी श्रीमती एलीयामा फिलीप, वय ५६ वर्षे, व्यवसाय स्टाफ नर्स, रा.ठी. १२ वा माळा, सदगुरू शरण, जक्शन २४ व २५ रोड, रेसीडन्सी हॉटेल समोर, थिरीसा स्कुल जवळ, वांद्रे (प) मुबंई ५० यांनी पोलीस ठाणे समक्ष फिर्याद दिली की, दिनांक १६/०१/२०२५ रोजी पहाटे ०२:०० वाजताच्या सुमारास फिर्यादी या सिनेअभिनेता सैफ अली खान व करीना कपुर यांचा लहान मुलगा जहागीर वय ०४ वर्षे व आया जुनु वय ३० वर्षे यांच्यासह बेडरूम मध्ये झोपलेले असताना एक अनोळखी इसमाने जबरी चोरी करण्याच्या इरादयाने हातात लाकडा सारखी सदृश्य वस्तु व हेक्सा ब्लेड सारख्या हत्यारासह अनधिकृतरित्या घरातील रूम मध्ये प्रवेश करून फिर्यादी यांच्याकडे पैशाची मागणी करून त्याच्या हातातील साधनानीशी फिर्यादी तसेच आया जुनु हिच्यावर आणि तेथे मदतीसाठी आलेल्या सिनेअभिनेता सैफ अली खान यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून सविस्तर जबाब नोंद करून वांद्रे पोलीस ठाणे गु.र.क्र ८५/२०२५ कलम ३११, ३१२, ३३१ (४), ३३१ (४), ३३१ (६), ३३१(७) भा. न्या. स अन्वये गुन्हा दाखल केला.

नमुद गुन्हयाच्या तपासाकरीता विविध तपास पथके तयार करण्यात आली. गुन्हयाचा तांत्रिक तपास करून गुन्हयातील आरोपी निष्पन्न करण्यात आला. आरोपी हा त्याचे मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास हिरानंदाणी इस्टेट, घोडबंदर रोड, ठाणे येथून ताब्यात घेवुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो मुळचा ग्राम राजाबरीया थाना नॉलसिटी, जि झलोकाठी बांग्लादेश येथील रहिवासी असल्याची व नमूदचा गुन्हा हा चोरी करण्याचे उ‌द्देशाने करण्यात आलेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने नमुद गुन्हयाच्या कलमात कलम ३ (ए), ६ (ए) भारतात प्रवेशास
प्रतिबंध अधिनियम १९४८ सह कलम ३ (१), १४ परकीय नागरीक आदेश १९४६ अन्वये वाढ करण्यात आलेली आहे.

गुन्हयातील अटक आरोपीचे नाव

१) शरीफुल इस्लाम शहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर वय ३० वर्षे रा.ठि. ग्राम राजाबरीया, थाना नॉलसिटी, जि झलोकाठी, बांग्लादेश

सदरचा संवेदनशिल गुन्हा मुंबई पोलीसांच्या विविध पथकांनी अथक प्रयत्न करुन अहोरात्र मेहनत घेवून उघडकीस आणलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (का व सू), श्री. सत्यनारायण चौधरी,, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे), श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. परमजितसिंग दहिया, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शशीकुमार मिना, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-९ श्री. दिक्षीत गेडाम, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण १) श्री. विशाल ठाकूर, पोलीस उप आयुक्त परि ५ श्री. गणेश गावडे, परि ६ श्री. नवनाथ ढवळे, यांच्या मागदर्शनाखाली वपोनि बांद्रा, मुंबई पोलीसांची आणि मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट