चुहा गँगच्या टोळीप्रमुखाला साथिदारांसह आंबेगाव पोलीसांनी बेड्या ठोकून एम.डी, पिस्टल केले जप्त..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चुहा गँगच्या प्रमुखासह त्यांच्या साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई पुणे पोलीस दलाच्या आंबेगाव पोलिसांनी केली. या कारवाईत एमडी, पिस्टल व इतर हत्यार जप्त करण्यात आले.

विद्येच्या माहेरघरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व गुन्हे शाखांना कारवाईच्या सूचना दिल्या. या सूचनांचे पालन करत आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मोहन कळमकर हे पथकासह संतोषनगर परीसरात गस्त घालत असताना खबऱ्याने चुहा गँगची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे डिलाईट बेकरीसमोर, संतोषनगर, कात्रज, पुणे येथे सापळा लावून पोलिसांनी तौसिफ जमीर सय्यद उर्फ ​​चुहा (२८, वर्षे, रा. जामा मस्जिदाचे बाजुला, संतोषनगर, कात्रज पुणे.), सूरज राजेंद्र जाधव (वय ३५ वर्षे, रु. मंगळवार पेठ, ता करमाळा, जि सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय-२९ वर्षे रा. रघुनंदन अपार्टमेन्ट, धानोरी पुणे), कुणाल कमलेश जाधव (वय-२५ वर्षे पवन स्विट होम शेजारी, सोमनाथ नगर, वडगाव शेरी पुणे) यांना ताब्यात घेतले.

या सर्वांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये ३ लाख रुपयांचे १५ ग्रॅम पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन, ४० हजार ५०० रुपयांची पिस्टल व एक जिवंत राउंड, मेफेड्रॉन (एम. डी) विक्री करून मिळवलेले ४ लाख ८० हजार रुपये, कोयता, दोन टुव्हिलर व एक फोर व्हिलर कार तसेच इतर हत्यारे जप्त करण्यात आली. भारती विद्यापीठ पो स्टे, गुन्हा रजि नं.९९७/२०२४ वी. एन. एस कलम ३१० (४), २२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४(२५), एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम २२ (क), २९, म.पो. अधि. कलम ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये वर नमुद चारही इसमांना अटक केली आहे. सदर आरोपींपैकी तौसीफ उर्फ चुहा हा गेल्या सहा महिन्यापासून भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता.

तसेच न्यायालयाने त्याला दोन वर्षांकरीता हद्दपार केले आहे. आरापी तौसीफ सय्यद उर्फ चुहा याच्यावर मोक्का, जबरी चोरी, खंडणी, अंमली पदार्थ विक्री, जिवे ठार मारणे असे विविध १५ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो, मा. पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ-२ पुणे शहर, मा. राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, प्रियंका गोरे सपोनि, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सुरेश शिंदे, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अविनाश रेवे, बाबासो पाटील, निलेश ढमढेरे यांचे पथकाने केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट