टेम्पोचा टायर पंचर काढण्यासाठी थांबलेल्या मंडणगड मधील चौघांना भरधाव दुचाकी स्वाराने उडवले…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

महाड:-

उपचारादरम्यान माणगाव रुग्णालयात एकाचा मृत्यू,,, तर अन्यजन जखमी…

महाशक्ती असोशियन ॲम्बुलन्स अपघातग्रस्तांच्या मदतीला…..
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून काल महाड शहराजवळील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग येथील केंबुर्ली गावच्या हद्दीत पंचर काढण्यासाठी चौघे मित्र टेम्पो जवळ उभे होते. त्याच वेळेस मुंबईच्या दिशेहून महाडकडे येणाऱ्या सुरज चंद्रकांत सावंत राहणार खैरे – तालुका – महाड याने आपल्या मोटरसायकलने भरधाव वेगात चौघांना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, यामध्ये दुचाकी स्वारासह चौघेही गंभीर जखमी झाले, यामध्ये फिराश उमर मुगरूस्कर, शिवम शिवदास साळवी, अकिब अब्दुल मजीद मुगरुस्कर, व यशवंत हरिचंद्र म्हाप्राळकर चौघेही राहणार म्हाप्रळ – तालुका – मंडणगड अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे असून यापैकी यशवंत हरिश्चंद्र म्हाप्राळकर याची प्रकृती चिंताजनक असल्याकारणाने याला अधिक उपचाराकरिता माणगाव येथे पाठविण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.



महाशक्ती ॲम्बुलन्स अपघाताच्या ठिकाणी वेळोवेळी तात्काळ दाखल होऊन मदत कार्य करीत असते. सदर अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून दुचाकीस्वार सुरज चंद्रकांत सावंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार सुरत सावंत याला देखील अधिक उपचार करता पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या गुन्ह्याचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट