चोरीच्या मोटार सायकल बाळणाऱ्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन दोन मोटार सायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना
सह संपादक -रणजित मस्के

जालना जिल्हयात मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे मा. पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
त्यानुषंगाने दिनांक 29/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती मिळाली की, इसम नामे सुरेश गंगाधर पवार, रा. मेरखेडा, ता. भोकरदन जि. जालना याच्याकडे चोरीच्या मोटार सायकल असुन तो सध्या कृष्णा मॉलसमोरील रस्त्याजवळ आहे. त्यानुषंगाने इसम नामे सुरेश गंगाधर पवार, रा. मेरखेडा, ता. भोकरदन जि. जालना याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याकडे त्याच्या ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे त्याचे ताब्यातील होंडा शाईन व हिरो एचएफ डिलक्स अशा दोन मोटार सायकल जप्त करुन त्याचे विरुध्द तालुका जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर दोन्ही मोटार सायक्लची अधिक माहिती मिळविली असता सदरच्या दोन्ही मोटार सायकल या जवाहरनगर पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर हददीतुन चोरी झालेल्या असुन जवाहरनगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 177/2025 कलम 303(2) भा.न्यां.सं. व गु.र.क्र.395/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये असे गुन्हे दाखल आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना श्री. अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा. पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, विजय डिक्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, योगेश सहाणे, सौरभ मुळे सर्व स्थागुशा यांनी केली आहे.