मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षानार्थीच्या मागण्यांकडे शासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष

प्रतिनिधी-सचिन पवार
माणगांव ;
मुखमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटना आपल्या हक्कासाठी देणार लढा
तात्काळ मागण्या पूर्ण न झाल्यास १६ जानेवारी रोजी आपल्या हक्कासाठी आजाद मैदान येथे भव्य मूक आंदोलनाचे संघटनेकडून निश्चय व्यक्त
महाराष्ट्र राज्यभरातून मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटना च्या वतीने अनेक प्रलंबित मागण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हाधिकारी यांना डिसेंबर महिन्यामध्ये विनंती पत्र देऊन शासनाकडे अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती करण्यात आली होती मात्र शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थिंच्या विनंती पत्रांचा शासनाकडून काही ही दखल न घेता शासनाकडून विनंती पत्राला चक्क केराची टोकरी देण्यात आल्यामुळे संतप्त मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटने मार्फत १६ जानेवारी रोजी आजाद मैदान मुंबई येथे भव्य मूक आंदोलन करण्यात येणार आहे असे शुक्रवारी ११ वाजता च्या सुमारास पंचायत समिती माणगांव समोर पत्रकार परिषद घेऊन माणगांव तालुका मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थ संघटनेच्या वतीने व संघटना सदस्यांचा उपस्थितीत तालुका सचिव शाहरुख बागवान व इतर पदाधिकारी यांच्या कडून खंबीर निश्चय व्यक्त करण्यात आले आहे .
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुका मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षाणार्थी संघटने मार्फत माणगांव गटविकास अधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे व जिल्ह्यात सर्व तालुका स्तरीय निवेदन देण्यात येतील. माणगांव तालुका मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटनेच्या वतीने १० जानेवारी रोजी संघटनेच्या काही पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना पुन्हा निवेदन देऊन मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षानार्थीच्या अनेक प्रलंबित मागण्या शासनाकडून तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे तसेच शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थिंच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास १६ जानेवारी रोजी आजाद मैदान मुंबई येथे जवळपास ५ लाख मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी मूक आंदोलन करणार असल्याचे खंबीर निर्णय देखील यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.