मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई एकनाथ शिंदे यांची बिरवाडी येथे लग्न सोहळ्याला हजेरी…
प्रतिनिधी-राकेश देशमुख
महाड:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई एकनाथ शिंदे यांनी आज बिरवाडी येथे एका लग्न सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती.
बिरवाडी येथील आदर्श नगर येथे केशव मधुकर सकपाळ यांची कन्या दिपाली व श्रीरंग गोविंद शिंदे यांचा चिरंजीव विकास यांचा आज शुक्रवार दी.१७ मार्च रोजी विवाह संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई एकनाथ शिंदे उपस्थित राहिल्या होत्या यावेळेस लताताई एकनाथ शिंदे यांचे स्वागत शिवसेना प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई गोगावले यांनी केले, लताताई एकनाथ शिंदे हळदी समारंभावेळी उपस्थित राहिल्याने यावेळी सकपाळ कुटुंबीयांकडून लताताई एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या कडून यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी बिरवाडी सरपंच एड.मनोज पवार,माजी सभापती सपना मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य मानसि पवार, शशिकांत कदम, राजू तांबे अशा अनेक मान्यवरांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com