चि.रुद्राक्ष बाळासाहेब पाटील याला नेमबाजीत सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान..

उपसंपादक-मंगेश उईके
पुणे

पालघर जिल्हाचे पोलीस अधीक्षक मा. श्री. बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना महाराष्ट्रातील खेळाडूंना दिला जाणारा सर्वोच्च प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार नेमबाजी (शुटींग) मध्ये "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार " पुणे येथे मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवर यांचे हस्ते रूद्रांक्षच्या वतीने पोलीस अधिक्षक पालघर मा. श्री. बाळासाहेब पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे.