छोटीशी आशा ट्रस्ट मार्फत लाईट ऑफ लाईफच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप..

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :=माणगांव येथील सरलादेवी मंगल कार्यालय येथे नुकताच छोटीशी आशा ट्रस्ट मार्फत लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माणगांव तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिलाई मशीन, सायकल, गिटार, तबला, की-बोर्ड, ढोलकी, मेकअप किट, स्मार्ट वॉच, स्टडी टेबल, क्रिकेट किट वाटप करण्यात आले. यावेळी छोटीशी आशा ट्रस्टचे सीमा राम मॅडम, उन्मेष पाटील, धरेंद्र सिंग, लाईफ ऑफ लाईफ ट्रस्ट कडून असिस्टंट मॅनेजर श्रुती माळगुणकर मॅडम, वरीष्ठ आनंदो अधिकारी स्वप्नील सर, सेजल शहा, माणगाव ऑफिस येथील सर्व अधिकारी वर्ग मीनाक्षी उभारे, प्रसाद विचारे आणि सर्व सेंटर कार्यकारी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे पालक प्रतिनिधित्व म्हणून पांडुरंग भागूराम मोरे यांनी सांभाळले.


छोटीशी आशा ट्रस्टचा कार्यक्रम लाईट ऑफ लाईफ च्या माध्यमातून सकाळी अकरा वाजता दिपप्रज्वलन करून सुरु करण्यात आला असून यावेळी छोटीशी आशाचे पदाधिकारी तसेच खरवली विभाग, साई विभाग तसेच इंदापूर विभागातील विद्यार्थी वर्ग व त्याचे पालक वर्गानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी उपस्थितीतांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घ्या आजच्या युगात शिक्षणापेक्षा कोणत्याही गोष्टीला महत्व नाही. शिक्षण हि काळाची गरज आहे.
छोटीशी आशाचा कार्यक्रम लाईट ऑफ लाईफ यांच्या माध्यमातून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. तसेच हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो. आणि यावेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप केले जाते. छोटीशी आशा या ट्रस्टचे काम अत्यंत उत्तम पद्धतीचे आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना हेरून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देत असतात.