छोटा राजन टोळीचा गुंड शाम तांबे उर्फ सॅवियो राॅडरीकस पिस्तूलासहमुंबई गुन्हे शाखा ३ च्या ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:– मुंबई : गॅंगस्टार छोटा राजन टोळीच्या गुंडाला गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने अटक केली.

या आरोपीकडून पोलिसांनी पिस्तूल व ३ जिवंत काडतूस जप्त केले आहे.
२६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी छोटा राजन टोळीचा गुंड शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रॉड्रीक्स हा वरळीतल्या जिजामाता नगर येथील कृष्णा हॉटेल येथे पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती कक्ष ३ च्या पथकाला प्राप्त झाली.

त्या माहितीच्या आधारे कक्ष ३ च्या पथकाने सापळा लावून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे आढळले. सदरबाबत ताब्यात घेतलेल्या इसमाकडे चौकशी करता, त्याचेकडे नमुद अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

 शाम पांडुरंग तांबे उर्फ ​​सॅवियो रॉड्रिग्स (वय ४२ वर्षे, धंदा- नाही, रा. ठि. वीर जिजामाता नगर, वरळी, मुंबई १८) याच्याविरुध्द गु.प्र.शा., गु.अ.वि.,वि.स्था. गु.र.क्र. १३/२०२४, कलम ३,२५ शस्त्र अधिनियम सह कलम ३७ (१) (अ), १३५ म.पो. का. (वरळी पोलीस ठाणे गु.र.क्र. १४१/२०२४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.  

हा आरोपी हा गॅगस्टर छोटा राजन टोळीचा सदस्य असुन त्याचे विरुध्द मुंबईतील अनेक पोलीस ठाणेत खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणे अशा विविध गंभीर गुन्हांची नोंद आहे. गुन्हयाचा तपास कक्ष ०३ कडून करण्यात येत असुन, कक्ष ३, गु.प्र.शा., गु.अ.वि, मुंबई यांनी केलेल्या कामगिरीमुळे सदर आरोपीकडुन भविष्यात घडणाऱ्या गंभीर अपराधांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई  लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण)  दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य)  चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष -३ चे प्रभारी पो. नि. दिपक सुर्वे, पो. नि. शामराव पाटील, पो.ह. आकाश मांगले, पो.ह. राहुल अनभुले, पो.ह. सुहास कांबळे, पो.ह. भास्कर गायकवाड, पोलीस हवालदार शिवाजी जाधव यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट