छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पी.एम.श्री.रा.जि.शाळा तळेगांव तर्फे वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न !

0
WhatsApp Image 2025-02-20 at 5.17.33 PM (1)
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

तळेगांव :– बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री ठिक 9.00 वाजता खास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पी.एम.श्री.रा.जि.प.शाळा तळेगांव तर्फे वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम 2025 चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावचे माजी सरपंच श्री.संतोष वाघमारे,गावच्या पोलीस पाटील – सौ.पुष्पाताई वाघमारे,केंद्र प्रमुख श्री.संतोष मालोरे सर, माणगांवच्या सामाजिक कार्यकर्त्या – सौ.सुवर्णाताई जाधव व त्यांच्या सहकारी महिला वर्ग, सौ.हर्षदा काळे – सोंडकर, उपनगराध्यक्षा तथा बांधकाम सभापती, नगरपंचायत, माणगांव, उद्योजक – श्री.सतीश नागे, गावचे नागरीक – श्री.विजय वाघमारे, श्री.प्रदीप माठल, वाघमारे बंधु व इतर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व स्वरोस्वती यांच्या मुर्तीचे पुजन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर मान्यवर वरांचे स्वागत शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने करण्यात आले.
गावामधील शिक्षण पुर्ण झाल्यावर मिलिट्री व पोलिस भरतीमध्ये यशस्वी झालेत तसेच उद्योग क्षेत्रातील यशस्वी युवा – तरुण उद्योजकांचा विशेष सत्कार मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.


रायगड जिल्हा काॅम्प्युटर असोसिएशन्स कडून शाळेला लॅपटॉप व प्रिंटर भेटवस्तु म्हणून देण्यात आले, गावच्या शाळेच्या वाढीव बांधकामासाठी निधी मिळावा,भविष्यात शेतकऱ्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, गावच्या व बचतगट महिलांना विविध योजनांतून रोजगाराची संधी मिळावी तसेच 50 वर्ष पुर्ण झालेल्या लोककलावंत भजनकर मंडळी यांना दरमहा पेन्शन मिळावी या साठी डाॅ.अजय मोरे व मान्यवर यांच्याकडून प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले व तसा शिबिर शाळेमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

शेवटी शाळेच्या शिक्षिका व प्रभारी मुख्याध्यापिका सौ. भांडविलकर मॅडम, शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती, तळेगांव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष व प्रचंड मेहनत घेतली

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट