शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक बहाण्याने जेष्ठ नागरिकास १ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणा-या ६ आरोपींना सायबर पोलीस स्टेशनने सापळा रचुन यशस्वीरित्या पकडुन गुन्हा उघड.

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे :

पुण्यातील जेष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअॅप कॉलव्दारे शेअर मार्केट इन्व्हेसमेंटबाबत अनन्या गुप्ता महिलेने संपर्क करुन (G5) UP stox value-added technical information sharing, Rajat Parmar Growth Visionary Blinkx PEI, (132) Star Alliance या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये अॅड करुन वेळोवेळी मो.क्रमांक- अ९१७७२५९९७६८१, रजत परमार व्हाट्सअॅप मोबाईल क्रमांक-अ९१८७९१५९७६५६, अ९६३३५४५६३९, अ७९९५१४८२३२. अ९१६३६६२०३५६२. हरी माथूर व्हाट्सअॅप मोबाईल क्रमांक-अ९१९९८१३७४६४३ यावरुन संपर्क साधुन शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतवाना मिळेल असे सांगुन अनेक बैंक अकाउंटवर ०१ कोटी ६० लाख रुपये वेळोवेळी भरण्यास प्रवृत्त करुन आर्थिक फसवणुक केली म्हणुन सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नं ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३१९ (२), ३१६ (५),३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल असुन त्याचा तपास सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथुन चालु आहे.

दाखल गुन्ह्याचा तत्परतेने तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यांवर घेतली असल्याने तपास करताना पुण्यातील वाघोली येथील आयडीएफसी बैंक खात्यात दि. १७/०३/२०२५ रोजी ०५,८२,०००/- रक्कन चेकव्दारे विथड्रॉल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा क्षणाचा विलंब न करता सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर बैंक खात्याचे खातेधारक आरोपी केतन उमेश मिवरे वय २७ वर्ष रा. खराडी, पुणे यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचा भाऊ आरोपी निखिल ऊर्फ किशोर सातव याने त्यांचे व मित्रांचे अनेक बैंक खाते बनवले आहे असे सांगितल्याने तात्काळ सायबर पोलीस पथकाने निखिल ऊर्फ किशोर जगन्नाथ सातव वय ३२ वर्षे रा वाघोली, पुणे याचा राहते घरी व खराडी परिसरामध्ये शोध घेतला परंतु पोलीस त्याचे मागावर असल्याची त्यास चाहुल लागल्याने संधीचा फायदा घेवुन तो पळुन गेला. गुन्ह्यातील बैंक खाते व मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक तपास केला असता, त्यात आरोपी आरोपी गोविंद संजग सुर्गवंशी नग २२ नर्षे रा. नाभोली, पुणे मुळ रा हिंगोली न
आरोपी रोहित सुशिल कंबोज वय २३ वर्षे रा वाघोली, पुणे मुळ रा. पंजाब यांचा सहभाग असल्याचे दिसल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. दोघे चतुर असल्याने त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची व असमाधान कारक उत्तरे देत असल्याने सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता ते सायबर गुन्ह्यातील फसवणुकीतील रक्कम पोलीसांना चकवा देत वेगवेगळ्या बँक खात्यात फिरवुन चेकव्दारे रक्कम विथड्रॉल करुन ती आरोपी बाबाराव उर्फ ओमकार भवर वय २२ वर्षे रा. वाघोली, पुणे मुळ रा. हिंगोली याचे मार्फतीने पुण्यातील एका ठिकाणावरुन दुस-या ठिकाणी तसेच हवाला मार्फतीने बाहेरील शहर व राज्यातील बँक खात्यातील चेक विथड्रॉल रक्कम आरोपी गोविंद सुर्यवंशी व रोहित कंबोज हे स्वीकारत होते. यातील गोविंद सुर्यवंशी हा पुण्यातील वाघोली परिसरातील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को.ऑप. बँकेचा संचालक असुन या बँकेच्या टेक्निकल कामात रोहित कंबोज काम करत असल्याने त्याचा फायदा घेत त्यांनी अनेक बैंक खात्यात हि रोख रक्कम भरलेली आहे. दोघे बी. टेक, उच्च शिक्षित असुन त्यांच्या डिगीव्हेंटरी, वननेस, रजत सेल अशा डिजिटल मार्केटिंग नावाच्या कंपन्या असुन त्यांना पुढील १० वर्षात एकुण १०० कंपन्या निर्माण करण्याचे स्वप्न होते. आरोपी गोविंद सुर्यवंशी व रोहित कंबोज हे दोघे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारामध्ये सक्रिय असुन त्यांनी त्याव्दारे अनेक युएसडीटी आरोपी जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित, वय ४५ वर्षे रा च-होली, पुणे मुळ रा. धारावी, मुंबई दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी जब्बारसिंह पुरोहित यास पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने तो व्यापारी असुन क्रिप्टोकरन्सी मधील व्यवहार करतो याबाबत असमाधानकारक उत्तरे दिली. परंतु आरोपी जब्बारसिंह पुरोहित याने गोविंद सुर्यवंशी व रोहित कंबोज यांना युएसडीटीच्या बदल्यात गुन्ह्यातील फिर्यादीच्या फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी काही रक्कम आरोपी केतन भिवरे याच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्स्पर केल्याचे निष्पन्न झाल्याने सायबर गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे सायबर पोलीसांनी ओळखले. तसेच फरारी आरोपी निखिल सातव यास देखील पकडण्यात सायबर पोलीसांना यश मिळाले.

वरिल सर्व ०६ आरोपी यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची एकुण १२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात यातील आरोपींनी सायबर गुन्हा करताना सुमारे १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला असुन नॅशनल सायबर पोर्टलवर त्यांच्या विरुध्द वेगवेगळ्या राज्यात एकुण २९ तक्रारी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे पुणे सायबर पोलीसांना संपुर्ण भारतातील २९ तक्रारी/गुन्हे उघडकिस आणण्यात यश मिळालेले आहे. आरोपीचे दुबई, गुजरात, वेस्ट बंगाल या ठिकाणी कनेक्शन असल्याचे तपासात निष्पन्न असुन सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथील पथक गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. विवेक मासाळ आर्थिक व सायबर, मा. सहा. पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे श्री मच्छिंद्र खाडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती खप्नाली शिंदे, पोलीस उप-निरीक्षक संदिप कदम, पोउपनि तुषार भोसले, पोलीस अंमलदार चव्हाण, मुंढे, संदिप पवार, दिनेश मरकड, यादव, नागटिळक, सचिन शिंदे, जमदाडे, सोनुने, सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर आणि (विशेष सहाय्य पोउपनि मेमाणे, चतुःश्रृंगी पो.स्टे. पुणे शहर) यांनी सदरची कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट