चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनकडून गुन्हयामधील जप्त केलेले ३६ तोळे सोन्याचे दागिने मा. पोलीस आयुक्त यांचे हरते फिर्यादी यांना सुपूर्द..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे








चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन येथे गेल्या दोन महिन्यामध्ये मालमत्ता चोरीबाबतचे १) गु. र. क्र. १८५/२०२५ मा. ३०६ प्रमाणे व ३) गु. र. क्र. २०८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल आलेले होते. पोलीस स्टेशन न्यां. संहिता-२०२३ चे कलम ३०६ प्रमाणे. २) गु. र. क्र. २००/२०२५. मा.न्यां. संहिता-२०२३ चे कलम ३०५ (अ) कडील तपास मुद्दयांच्या आधारे तपास करून नमूद गुन्हयांमध्ये आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून गुन्हयामध्ये चोरीस गेलेला एकूण २२ लाख रुपयांचे ३६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरचा किमती मुद्देमाल हा मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या हस्ते नमूद गुन्हयामधील फिर्यादी यांना परत करण्यात आला. त्यावेळी फिर्यादी यांना त्यांचा किंमती मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांनी पुणे पोलीसांचे आभार मानले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परी-४, पुणे शहर हिंमत जाधव, मा. सहायक पोलीस आयुक्त, विठ्ठल दबडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजयानंद पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे, आश्विनी ननवरे, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, तपास पथकातील पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, श्रीधर शिर्के, बाबुलाल तांदळे, इरफान मोमीन, बाबा दांगडे यांनी केली आहे.