चारोटी , कासा येथे २५ लाखांचे एम डी ड्रग्ज जप्त

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशानुसार जिल्हामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम सूरु असून या अंतर्गत सर्वत्र शोध मोहीम राबविण्यात येत आहे ,कासा पो ठाणे चे प्रभारी अधिकारी पो नि अविनाश मांदले व पथक हे पो ठाणे हद्दीत गस्त आणि संशयित इसम यांची तपासणी करत असताना अप्सरा होटल चे समोर चारोटी येथे एक संशयित इसम बैग घेवून जात असताना मिळून आला. त्याचा संशय आलेने दोन पंचाना बोलावून त्याची अंगझडती आणि बैग ची तपासणी केली असता बैग मधे वापरते कपडे च्या आत एक पिशवी मधे सफेद कागदामधे सेलो टेपने गुंडाळलेले एक पुडके मिळुन आले. सदर इसम ने त्यात काय आहे या बाबत उपयुक्त माहिती न दिलेने व फक्त अमली पदार्थ आहे असे सांगत असलेने व तसा संशय बळावल्याने लागलीच पो नी स्थानिक गुन्हे शाखा पालघर याना पत्र देऊन अमली पदार्थ तपासणी किट मागून घेणेत आले. प्रशिक्षित अंमलदार पो हवा सूर्यवंशी यांचे कडून २ पंच समक्ष तपासणी केली असता सदर पुडकेत एमडी हा अमली पदार्थ असलेची खात्री झाली.

  त्यांनतर वजन काटा मागवुन वजन केले असता पुडके सह वजन केले असता सुमारे १२५ ग्राम वजन असलेले एमडी किंमत अंदाजे २५ लाख रुपये चा माल मिळून आलेले रीतसर पंचनामा करण्यात आला असून इसम नामे राज बाबन शेअल वय २६ वर्ष रा बांद्रा मुंबई यास ताब्यात घेण्यात आले असे.

सदरचा संशयित इसम अहमदाबाद वरुन मुबई येथे जाताना चारोटी येथे वाहन बदलून जाणे साठी उतरला होता . कासा येथे गुन्हा दाखल करणे ची प्रक्रिया चालू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *