चांदुर रेल्वे पोलीसांची जुगार अडडयावर धडक कार्यवाही

ग्राम मालखेड
सह संपादक -रणजित मस्के

दि. २७/०६/२०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मालखेड रेल्वे येथे आठवडी बाजार बीएसएनएल टॉवर जवळ काही इसम एक्का बादशाह नावाया हारजित जुगार खेळ खेळत आहे अशा मिळालेल्या माहीतीच्या आधारे मिळालेल्या माहीतीच्या आधारे खाजगी वाहनाने ग्राम मालखेड रेल्वे येथे लपत छपत गेलो असता ग्राम मालखेड रेल्वे येथे आठवडी बाजारातील बिएसएनएल टॉवर जवळ गेलो असता बाजुला काही इसम गोलाकार बसुन दिसले. सदर इसम हे एक्का बादशाह नावाचा हारजिचा जुगार खेळ खेळत असल्याची पंचाची व आमची खात्री पटल्याने लागलीचे त्याचेवर जुगार रेड केला असता जुगार खेळणारे इसम जागीच मिळुन आले त्याचे ताब्यातुन जुगाराचे नगदी ७९६० रू, तिन अॅण्ड्राईड मोबाईल कि ३००००/रू व ४ साधे मोबाईल कि २००० रू, १) होंडा शाईन कंपनीची मोसा क. एमएच २७ डीएस ५४९५ कि. ७५००० रू २) बजाज पल्सर कंपनीची मोसा क एमएच २७ सिएफ ५८१७ कि ७५००० रू ३) हिरो होन्डा पेंशन मोसा क एमएच २७ एबी २३१९ कि.अ. ३५,०००/रू. ४) होंडा शाईन मोसा एमएच २७ सिके ४९२४ कि ६००००/- असा एकुण २८४९६०/रू चा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला. आरोपी नामे १) सुमेरसिंग दासु चव्हाण वय ३८ वर्ष २) चंदु हंजा चव्हाण वय ६५ वर्ष ३) दिपक विष्णु चव्हाण वय ५५ वर्ष ४) प्रेमदास शिवलाल चव्हाण वय ५२ वर्ष ५) सुधीर शालीकराम चव्हाण वय ३८ वर्ष ६) राजु वासुदेवच जाधव वय ४९ वर्ष सर्व रा लालखेड ७) प्रविण सुधाकर मेश्राम वय ३४ वर्ष राम अंबादास काळसर्पे वय २८ वर्ष ९) अशोक लक्ष्मण जेवडे वय ६२ वर्ष सर्व रा मालखेड रेल्वे यांचेवर कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा.श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. श्री पंकज कुमावत सा. उपविभागीस पोलीस अधिकारी सा. श्री अनिल पवार, यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक अजय आकरे, परी पोउपनि रोहीत कुदळे, पोलीस अंमलदार शिवाजी पुगे, निलेश रिठे, गजानन वाघमारे, प्रविण मेश्राम, अतुल क्षीरसागर, प्रशांत ढोके, यांनी केली.