चंदननगर पोलीसांनी दुचाकी मोटार सायकल चोरांच्या आवळल्या मुसक्या.

सह संपादक – रणजित मस्के
पुणे ;यातील फिर्यादी यांनी दिनांक १७/०३/२०२५ रोजी ०६/०० ते ०७/३० वा दरम्यान समता हौसिंग सोसायटी समोर मोकळ्या मैदानात, नागपाल रोड, चंदननगर पुणे येथे त्यांनी त्यांची दुचाकी मोटार सायकल, ही लॉक व पार्क करुन ठेवलेली असताना, कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीचे इरादयाने फिर्यादी यांच्या संमती शिवाय चोरुन नेली आहे. म्हणुन दिलेल्या तक्रारी वरुन चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं.१३०/२०२५, मा.न्या. संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पो. अधिकारी व पो. अंमलदार हे दिनांक २१/०३/२०२५ रोजी चैन चोरी, चैन स्नॅचिग, मोटार सायकल चोरी प्रतिबंधाचे अनुषंगाने खाजगी वाहनां वरून दैनंदिन पेट्रोलींग करीत असताना २२/०० वा सुमारास रेडीसन चौक खराडी पुणे येथे आले असता, पो. हवा. कोळेकर, पो. अमंलदार कदम, यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचे करवी बातमी मिळाली की, दोन दिवसापूर्वी चोरीस गेलेली दुचाकीसह दोन इसम लाल माती ग्राउंड वडगाव शेरी पुणे येथे उभे आहेत त्यानुसार तपास पथकातील पो. अधिकारी व पो. अंमलदार हे सदर ठिकाणी गेले असता, संशयित दोन इसम त्यांना पाहुन पळुन जावु लागले त्यांना पोलीसांनी पाठलाग करुन ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव १) वैजनाथ दिंगबर साठे, वय २४, रा. नानाश्री रेसेडेन्सी आव्हाळवाडी, वाघोली पुणे २) करण सखाराम पवार, वय २६, रा. नानाश्री रेसेडेन्सी, आव्हाळवाडी वाघोली पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना त्याच्या ताब्यात असलेल्या हिरो कंपनीची स्प्लेंडर नंबर प्लेट नसलेली दुचाकी मोटार सायकल बाबत विचारपुस करता, ते उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले त्यामुळे त्यांना दुचाकीसह चंदननगर पोलीस स्टेशन पुणे येथे घेवुन येवुन त्यांच्या ताब्यातील दुचाकी मोटार सायकलबाबत पोलीस स्टेशनकडील नजीकच्या काळात वाहन चोरी संर्दभात दाखल गुन्हयाचे अभिलेख पाहता, सदरची मोटार सायकल ही चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिनं. १३०/२०२५, भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३(२) मधील चोरीस गेलेली मोटार सायकल असल्याचे निष्पन्न झाले.सदर आरोंपीकडे कसुन तपास करता, त्यांनी मुंढवा ब्रीज खालुन हिरो कंपनीची स्पेल्डर प्लस मोटार सायकल चोरली असल्या बाबत सांगितल्याने ती जप्त केली असुन सदर दुचाकी बाबत मुंढवा पोलीस स्टेशन कडील अभिलेखाची पाहणी करता मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिनं ७५/२०२५, मा.न्या. संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले याप्रमाणे वरील सराईत चोरटे यांच्या कडुन वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस केले आहेत.सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-४ पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पो.स्टे. श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक अजय असवले, पोलीस अंमलदार अमोल कोळेकर, विश्वनाथ गोणे, शिवा धांडे, विकास कदम, शेखर शिंदे, यांचे पथकाने केली आहे.