चंदननगर पोलीसानी दुचाकी मोटार सायकल चोर अश्फाक पठाण यास केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे :यातील फिर्यादी वय ४३ वर्षे, रा. वडगावशेरी पुणे वांनी त्यांची मोटार सायकल हि राहते घरा समोर लॉक करुन पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीचे इरादयाने स्वतःचे फायदयाकरीता चोरी केली म्हणुन दिलेल्या तक्रारी वरुन चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिनं. १३२/२०२५, मा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.चंदननगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पो. अधिकारी व पो. अंमलदार हे दिनांक २२/०३/२०२५ रोजी दैनंदिन पेट्रोलींग करीत, असताना १९/३० वा सुमारास सुंदराबाई शाळा जुना मुंढवा रोड येथे आले असता, पो. हवा धांडे, पो. अमंलदार शिंदे, यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचे करवी बातमी मिळाली की, चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरीस गेलेल्या दुचाकीसह एक इसम ऑक्सीजन पार्क, मुंढवा रोड, वडगाव शेरी पुणे येथे उभा आहे.त्यानुसार तपास पथकातील पो. अधिकारी व पो. अंमलदार हे सदर ठिकाणी गेले असता, संशयित इसमाला पोलीस असल्याचे चाहुल लागताच तो जुना मुंढवा रोडने सदर दुचाकी वरुन पळून जात असताना, त्याचा पाठलाग करुन बॉलीवुड थेटर्स समोर ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव अशपाक इसाक पठाण, वय २९, रा. इंद्रानगर पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याला त्याचे ताब्यात असलेल्या हिरो कंपनीची स्पॅल्डर प्लस दुचाकी मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत विचारपुस करता, तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यास दुचाकीसह चंदननगर पोलीस स्टेशन पुणे येथ घेवुन येवून त्याचे ताब्यातील दुचाकी मोटार सायकल बाबत पोलीस स्टेशन कडील नजीकच्या काळात वाहन चोरी संर्दभात दाखल गुन्हयाचे अभिलेख पाहता, सदरची मोटार सायकल ही वरील दाखल गुन्हया मधील असल्याचे निष्पन्न करुन सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ-४ पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदनगर पो.स्टे. च्या श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक अजय असवले, पोलीस अंमलदार अमोल कोळेकर, विश्वनाथ गोणे, शिवाजी धांडे, विकासकदम, शेखर शिंदे, यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट