चंदननगर पोलीसांची रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या गायकवाडवर तडीपारची कारवाई..

सह संपादक-रणजित मस्के
पुणे
चंदननगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे प्रथमेश ऊर्फ मोन्या सुनील गायकवाड, वय २० वर्षे, रा. इंदिरानगर, लेन नं.३, निरामय हॉस्पीटल जवळ, वडगावशेरी पुणे. यास मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ (एक) वर्षाकरीता तडीपार केले आहे.
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील वडगावशेरी, तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरिकांना वारंवार त्रास देणा-या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणा-या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होऊ नये तसेच सदर सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर मा. सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती सीमा ढाकणे, चंदननगर पोलीस स्टेशन व पोलीस अंमलदार शशिकांत गायकवाड, विकास कदम, अनूप सांगळे यांनी सदर सराईत ईसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर श्री. हिम्मत जाधव यांना प्रस्ताव पाठविला असता, श्री. हिम्मत जाधव यांनी सदर सराईतास पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ (एक) वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती सीमा ढाकणे, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस अंलदार शशिकांत गायकवाड, विकास कदम, अनुप सांगळे यांनी केली.