चांभारखिंडीतील सोमजाई अपार्टमेंट मधील अनधिकृत दुकानाविरोधात विनय वनारसेंचा आमरण उपोषणाचा इशारा…!

प्रतिनिधी-रेशमा माने
महाड तालुक्यातील ग्रामपंचायत चांभारखिंड हद्दीतील सोमजाई अपार्टमेंट मधील घर क्रमांक ४७१/४ सदनिका क्रमांक ३ मध्ये अनधिकृतरित्या दुकान व्यवसाय सुरू आहे.

अपार्टमेंट मध्ये सुरू असलेल्या दुकानाविरोधात अपार्टमेंट मधील रहिवाशांनी याअगोदर तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर केले होते.


याच अपार्टमेंट मधील रहिवाशी विनय वनारसे यांनी सदरील अनधिकृत दुकानाविरोधात ग्रामपंचायत व पंचायत समितीत तक्रारी अर्ज सादर केले होते .
या अर्जांच्या प्रत्युत्तरात चौकशी झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी हा अनधिकृत दुकान व्यवसाय बंद करणेसाठी लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायतीस अवगत केले होते.
प्रशासकाने दुकान धारकास अनधिकृत दुकान बंद करणेची सूचनाही दिली होती.
परंतु सर्व प्रक्रियेनंतरही दुकान बंद होत नसल्याने विनय वनारसे हे महाड पंचायत समिती कार्यालयासमोर २० जानेवारी २०२२ रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे त्यानी सुरक्षा पोलीस टाइम्सला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com