चामारलेणी येथील अज्ञात व्यक्तीच्या खुन प्रकरणातील ४ आरोपी गुन्हे शाखा युनिट क. १ नाशिक शहर यांचा जाळ्यात..

सह संपादक -रणजित मस्के
नाशिक

फिर्यादी बामे पोहवा / ३०७ प्रभाकर रंगनाथ सोनवणे यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे तकार दिली की, दिनांक २२/०६/२०२५ रोजी ०६:४५ वाजेच्या पूर्वी मिळून आलेला अनोळखी इसम (मयत) यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता त्याचेजवळील धारदार हत्याराने तोंडावर, डोक्यावर वार करून जिवे ठार मारूर चांमार लेणी बोरगड, पेठरोडचे पायथ्याशी कच्चा रोडवर मारून टाकले बाबत आहे. वगैरे मजकुराच्या दिलेल्या तक्रारी वरून म्हसरूळ पोलीस ठाणे येथे । गु.र.नं. १७२/२०२५ भा. न्या. सं. कलम १०३(१) प्रमाणे दिनांक २२/०६/२०२५ रोजी १४:०३ वाजता गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मा. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा.श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), मा. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांनी सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेकामी गुन्हेशाखा ५ टिम तयार केल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटनास्थळास तात्काळ
भेट देवुन आजुबाजूच्या सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली, तसेच अज्ञात मयत इसमाची ओळख पटवुन सदर इसमाचे नाव उमेश नागप्पा ऑबिगार, वय ३४वर्षे, रा-मरकुंडा गाव, ता. जि. बिदर राज्य कर्नाटक असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून काही संशयित वाहने निदर्शनास आली. त्यावरून त्या वाहनांचा सी.सी.टी.व्ही फुटेजद्वारे माग काढून त्याचा विश्लेषनात्मक अभ्यास करून त्यातील एक संशयित मोटार सायकल व निष्पन्न केली. त्यावरून त्या मोटार सायकलचा शेवटपर्यंत माग काढून तसेच त्या आधारे मानवी कौशल्याचा वापर करून गुप्त बातमीदारांकडुन माहिती काढून आरोपीची नावे निष्पन्न केली. पोहवा/प्रविण वाघमारे, पोहवा/विशाल काठे, पोहवा/संदिप भांड, पोअं/मुक्तार शेख, पोअं/आप्पा पानवळ यांना त्यांच्या गुप्त बालमीदार यांच्या मार्फतीने बालमी मिळाली तसेच पोहवा/महेश साळुंके व पोअं/राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून सदरचे आरोपी हे म्हसरूळ व बोरगड परिसरातील राहणारे आहेत. सदरची माहिती वपोनि श्री. मधुकर कड सर यांना देवून त्यांनी गुम्हेशाखा युनिट ०१ वे सपोनि/हिरामण भोये, पोउनि/सुदाम सांगळे, पोहवा / प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, चालक पोहवा/सुकाम पवार, चालक पोअं/समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले. त्या अनुषंगाने नमुद पथकाने सदर पाहीजे आरोपीतांचा म्हसरूळ व बोरगड परिसररात शोध घेतला असता दिनांक ०४/०७/२०२५ रोजी १) विजय मधुकर खराटे, वय-२० वर्षे, रा- वडनगर, जैन मंदिरजवळ, म्हसरूळ नाशिक, २) संतोष सुरेश गुंबाडे, वय २६ वर्षे, रा गणेशचौक, कोळीवाडा, म्हसरूळ नाशिक, ३) अविनाश रामनाथ कापसे, वय-२० वर्षे, रा-फ्लॅट नं. ८, गणेश अपार्टमेंट, राउ होटेल जवळ, मखमलाबाद, म्हसरूळ लिंकरोड, नाशिक, ४) रवि सोमनाथ शेवरे, वय २८ वर्षे, रा. दत्तमंदिर व्या पाठीमागे, मानोरी गाव, पोस्ट पिंपळनारे, ता. दिंडोरी, जि. नाशिक असे मिळून आल्याने त्यांना शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. वरील सर्व चारही आरोपीतांना विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, रवि सोमनाथ शेवरे याने आरोग्य विज्ञान विदयापीटच्या जवळ, दिंडोरीरोड, नाशिक येथे उभ्या असलेल्या एका ट्रक चालक याची रेकी करून सदर ट्रक चालकाकडून मोबाईल व भरपुर पैसे भेटतील अशी माहिती देवुन सदर बाबत आम्ही चौघांनी प्लॅन तयार करून सदर ट्रकमध्ये अविनाश कापसे, संतोष गुंबाडे, विजय खराटे असे सिगारेट पेटवण्याच्या बहाण्याने चालकास उठवुन त्याने ट्रकचा दरवाजा उघडला असता सदर ट्रकचे केबिनमध्ये घुसून त्यांच्याकडे जबरदस्तीने पैश्यांची मागणी केली असता त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष गुंबाडे याने टोकदार दगडाने चालकास डोक्यास मारून तसेच व इतर दोघांनी त्यास गंभीर मारहाण करून जखमी केले व त्याचेकडील दोन
ए.टी.एम कार्ड काढून घेवुन त्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवुन त्याचेकडून ए.टी.एम.चा पिनकोड विचारून संतोष गुंबाडे हा पैसे काढण्यासाठी ए.टी.एम मध्ये गेला असता ट्रक चालक मयत याने ए.टी.एम.चा पिनकोड चुकीचा दिल्याने व ए.टी.एम मधुन पैसे न निघाल्याने त्याचा आरोपीलांना राग आल्याने त्यांनी मयत यास पुन्हा ट्रकचे केबिनमध्ये मारहाण करून विजय खराटे याची यमाहा कंपनीची एफ. ड्रझेड मोटार सायकलवर ही संतोष गुंबाडे याने चालविण्यास घेवून सदर गाडीवर मयत यास पकडुन बसवुन त्याच मोटार सायकलवर विजय खराटे व त्याचे मागे अविनाश कापसे असे चौघे जण एकाच मोटार सायकलवर बसुन ए.टी पवार शाळेजवळ अवतार पाईंट येथे असलेल्या तीन ए.टी.एम मध्ये घेवुन जावुन मयत याचे दोन्ही ए.टी.एम द्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता मयत याने चुकीचा ए.टी.एम पिनकोड सांगितल्याने पैसे न निघाल्याचा राग आल्याने मयत यास पुन्हा मोटार सायकलवर बसवुन चामर लेणीच्या पायथ्याशी नेवुन दांडक्याने, दगडाने, लाथाबुंक्याने मारहाण करून तेथे असलेल्या पावसावे पाण्याचे साचलेल्या डबक्यात नाक व तोंड बुडवून, गाळा दाबुन त्यास जीवेठार मारल्याची कबुली दिली. तसेच रवि सोमनाथ शेवरे हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकलवर चामर लेणी येथे येवुन मयतास मारहाण करत असतांना त्याचे साथीदार यांना कोणी पाहत आहे का? बाबत टेहाळणी करत होता. या बाबत महिती देवुन गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपीतास पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सपोनि/हिरामण भोये, मसपोनि /जया तारडे, पोउनि / चेतन श्रीवंत, पोउनि/सुदाम सांगळे, श्रेणी पोउनि/किरण शिरसाठ, पोहवा / प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मस्क्ड, विशाल काटे, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, महेश साळुंके, रोहिदास लिलके, उत्तम पवार, रमेश कोळी, रविंद्र आढाव, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, पोअं/मुक्लार शेख, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, गोरक्ष साबळे, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, मपोहवा/शर्मिला कोकणी, अनुजा येलवे, मनिषा सरोदे, चालक पोहवा/सुकाम पवार, चापोअं/ समाधान पवार यांनी केली आहे.