चैतन्य इंडीया फीन क्रेडीट प्रा. लि. वाई शाखा सातारा येथील वसुली अधिकारी यास मोटर सायकल आडवी मारुन जबरस्तीने पैसे हिसकावून नेहणा-या चोरटयांचा शोध घेवून त्यांना धर्मपूरी ता. माळशिरस जि. सोलापूर येथून ताब्यात घेवून गुन्हा ३६ तासात आणला उघडकीस…

उपसंपादक-रणजित मस्के
भुईंज: -दिनांक ०४ /७/२०२३ रोजी १३.५० वा. मौजे केंजळ गावचे हद्दित बोडरे वस्ती ते केंजळ जाणारे कच्चा रोडने जात असताना बेघर वस्तीजवळ पाठीमागून आलेल्या काळया रंगाच्या मोटर सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी त्याची मोटर सायकल फिर्यादी यांचे मोटर सायकलला आडवी मारुन मोटर सायकलचे पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादी यांचे जवळ असणारी सॅक १,५०,०६०/- रुपये एवढी रोख रक्कम व फायनान्स कंपनीचे ७६६०१ ते ७६८०० या क्रमांकाचे पावती पुस्तक तसेच सदर सॅक मध्ये फिर्यादीचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड व ड्रायव्हींग लायसन्स अशा वस्तू असलेली सॅक अज्ञात आरोपी यांनी हिसकावून मोटर सायकलववरुन पळून गेले आहेत वगैरे मजकुरचे खबरीवरुन गुन्हा रजि. दाखल आहे.
सदरचा गुन्हा उघड करणेबाबत मा. श्री समीर शेख, भा.पो.से. पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी सुचना दिल्या होत्या. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ घटनास्थळचे आसपासचे तसेच आरोपीनी गुन्हा केलेनंतर ज्या रोडनी गेले त्या रोडचे ३० ते ३५ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हयात आरोपीनी वापरलेली मोटर सायकल निष्पन्न केली तसेच तांत्रिक माहितीचे आधारे गुन्हयातील दोन आरोपी निष्पन्न केले. आरोपी हे धर्मपूरी ता. माळशिरस जि.सोलापूर येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गुन्हयातील आरोपींना पकडणेसाठी तात्काळ धर्मपूरी ता. माळशिरस जि.सोलापूर येथे तपास पथक पाठवून तांत्रिक माहितीवरून गुन्हयातील दोन आरोपी ताब्यात घेतले. सदर गुन्हयात आतापर्यंत आरोपींचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या सॅकमधील रक्कम ३५,०००/- रुपये, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पावती पुस्तक तसेच गुन्हयात वापरलेले वाहन, गुन्हयात आरोपींनी वापरलेला मोबाईल असा एकूण ८८,०००/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पुढे सुरु आहे.

श्री. समीर शेख, भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री. बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पोउनि भंडारे, पोउनि उमाप, पो.हवा. नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला आहे. सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर ३६ तासात उघडकीस आणले बाबत सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.
आरोपीची नावे –
१) अजय मोहन पाटोळे वय २२ वर्ष, रा. धर्मपूरी, ता. माळशिरस जि. सातारा
२) दिपक नाना जाधव वय ३७ वर्ष, रा. धर्मपूरी ता. माळशिरस जि. सातारा
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com