चैन स्नॅचिंग करणार्या चोरट्यांना १२ तासाचा आत डीसीपी सचिन गोरे यांच्या पथकाने केली अटक

प्रतिनिधी : विश्वनाथ शेनोय
उल्हासनगर : ठाणे

दिनांक १२ जुलै २०२५ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दित दि.०४ रोजी सकाळी ०८:२० वा फिर्यादी हया त्यांचे नातवास स्कुल बसमध्ये सोडण्यासाठी बिल्डींगचे खाली येऊन रोडवर थांबल्या असताना, अज्ञात तीन आरोपीत यांनी मोटारसायकल वरून येवुन फिर्यादी यांचे गळयातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने खेचुन चोरून नेलेबाबत तकार देण्यात आले होते.व अज्ञात चैन खेचनारे आरोपीविरूध्द शिवाजीनगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ पुर्व गु.र.न.५५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे दि.०४/०७/२०२५ रोजी दाखल करण्यात आले.
नमुद गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हयाचे तपासाबाबत पोलीस उप आयुक्त, परि-४.उ.नगर सचिन गोरे ,सहा. पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभागाचे शैलेश काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन, आरोपी यांचे तपासासाठी दोन वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले. तपास पथकातील अंमलदार यांनी अज्ञात आरोपी यांचे तपासकामी गुप्त बातमीदार, तांत्रीक विश्लेषनाच्या सहायाने आरोपीत याचेबाबत माहीती प्राप्त करून, त्यांचे ठाव ठिकाणाबाबत माहीती काढुन आरोपीत १) आकाश उर्फ बटला राजु सिंग, वय-२६ वर्ष २) रणजित छैल सिंह, वय-१९ वर्षे ३) अमन जंगली यादव, वय २० वर्षे यांना बदलापुर पुर्व येथुन शिताफिने अटक करून, आरोपी यांचेकडे सखोल तपास करून आरोपीत यांनी शिवाजीनगर पो. ठाणे व बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने आरोपी यांचेकडुन एकुण ४ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, एक मोटारसायकल असा एकुण २,३८,०००/- रू किमतीचा मुददेमाल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, पु.प्रा.वि. कल्याण, सचिन गोरे, पोलीस उप. आयुक्त, परिमंडळ ४, उल्हासनगर, शैलेश काळे, सहा. पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि रमेश पाटील, पोउपनि/चौरे, पोहवा/६३१० पादीर, पोहवा/७३८९ देवरे, पोहवा/६३४५ वळवी, पोहवा ६०८३ खामकर, पोना/७१८४ भोसले, पोशि/राजगे, पोशि/पवार, पोशि/गायकर, पोशि/काकडे, पोशि/बोडके, पोशि/चत्तर, पोशि/आरोटे, पोशि/शेख यांनी पार पाडून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.