सेंच्युरी मिल कामगार एकता मंच
पश्चिम महाराष्ट्रात गिरणी कामगारांची एकजुट …!

0
Spread the love

प्रतिनिधी-भारती राणे

गिरणी कामगारांची दलाला पासून होणारी फसवणूक /लूट थांबण्यासाठी जनजागृती अभियानअनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे .

गेले 15 मार्च 2022 पासून पश्चिम महाराष्ट्रातील कराड, सातारा, जेहे, कुमठे,कन्हेरखेड,सासपटे,कुसावडे,एक्सळ,कोरेगांव,निगडीएकंबे,तांदुळवाडी,सासुर्डे,दुघी, अशा अनेक गावा गावात जाऊन सेंच्युरी मिल कामगार एकता मंचच्या वतीने गिरणी कामगारांना मार्गदर्शन केले जात आहे.
गिरणी कामगारांनी व वारसांनी हक्काची घरे घेण्यासाठी आपला संघर्ष पुन्हा तिव्र करावा व लाभार्थी गिरणी कामगारांची घरे दलालांच्या माध्यमातून परप्रांतीयांना बेकायदेशीर घरे विकली जात आहेत याला आळा बसावा, यासाठी कामगारांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी व्हाॅटसप, फेसबुक, युटूब, वेबसाइट, चा वापर कसा करता येईल याची माहिती गावा गावात जाऊन सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे पदाधिकारी हेमंत गोसावी, गणपत भोसले, नथू सराटे, आनंदराव यादव, रविंद्र शिंदे, शिरिष पवार, फडतरे परिवार व इतरही सदस्य गिरणी कामगार काम करत असून याला कामगारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे,
या विभागातील स्थानिक मा.आमदार शिवेंद्र राजे भोसले ,मा शशिकांत शिंदे साहेब, मा महेश शिंदेसाहेब,यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली व गिरणी कामगारांची प्रचंड प्रमाणात फसवणूक /लूट कशी होत आहे याची माहिती पत्रकही दिले.

भूमिपुत्र मराठी गिरणी कामगार व वारसांना 80% लॉटरीत प्राधान्य का मिळाले पाहिजे ही भूमिकाही त्यांना समजवण्यात संघटनेला यश आले आहे.लवकरात लवकर गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी व इतर प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत याचे निवेदन पत्र ही दिले आहे .

सुप्रसिद्ध मराठी उद्योजक (मालक) मा. पराग काटदरे यांनी स्थनिक कामगारांच्या मुलांसाठी रोजगार निर्मिती करावी यासाठी संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट