केंद्रीय योजनांच्या सहकार्याने औषध वनस्पतींची राज्यात लागवड वाढवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव: आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय औषध नियंत्रण बोर्ड औषधी वनस्पतींची लागवड, संरक्षणाकरीता काम करीत आहे. केंद्र शासन औषधी वनस्पतींच्या संवर्धन, संरक्षणासह मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी सहकार्य करण्यास तयार आहे. केंद्र आपल्या विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून औषधी वनस्पतींची प्रमाणीत कच्च्या मालाच्या स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी काम करीत आहे, केंद्र शासनाच्या उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर राज्यात औषधी वनस्पतींची लागवड करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुष (स्वतंत्र प्रभार) मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव, अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, आपल्या पारंपारिक उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांचा समावेश आहे.आजार कमी करण्यासाठी सध्याही औषधी वनस्पती गुणकारी आहे. अशा औषधी वनस्पतींचे संरक्षण, लागवड होणे काळाची गरज असून त्यांना वनांमधून प्राप्त करता येत आहे. केंद्र शासनाकडून औषधी वनस्पतींच्या प्रक्रिया उद्योगासाठी आर्थिक मदत देण्यात येते.
तसेच औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी उत्तम साठवणूक व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. केंद्र शासन महाराष्ट्र शासनासोबत या क्षेत्राच्या विकासासाठी काम करेल. शेतकऱ्यांसाठी औषधी वनस्पतींच्या लागवडीतून रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यामुळे या योजनेवर गांभीर्याने काम करून शेतकऱ्यांना नवीन रोजगाराचे दालन उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट