जिल्हा परिषद पालघर येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी…

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :- आज दिनांक 15/10/2024 रोजी जिल्हा परिषद पालघर येथे भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अवुल पाकीर जैनुलाब्दिन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१ – २७ जुलै २०१५) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना “मिसाईल मॅन” म्हणून ही ओळखले जाते. २००२मधे डॉ.कलाम यांची ११वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांना “पीपल्स प्रेसिडेंट” (जनतेचे राष्ट्रपती) म्हणून व्यापकपणे संबोधले जाते. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले. डॉ.कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो.


अशा थोर महापुरुषाची जयंती आज साजरी करण्यात आली. यावेळी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, कार्यकारी अभियंता (पा.पु)राजेश पाध्ये, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश राठोड, इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट